पाचोरा तालुक्यातील नेरीत तब्बल २७ वर्षा नंतर पुन्हा अंपग चढला लग्नाच्या बोहल्यावर :नवरदेव वय ५२ तर नवरी ४८ विवाह बंधनात

पाचोरा तालुक्यातील नेरीत तब्बल २७ वर्षा नंतर पुन्हा अंपग चढला लग्नाच्या बोहल्यावर :नवरदेव ५२ तर नवरी ४८ विवाह बंधनात

पाचोरा (प्रतिनिधी) :- तालुक्यातील नेरी गावात नवरदेव ५२ वर्षीय अपंग तर नवरी ४८ वर्षाची पुन्हा लग्नाच्या बोहल्यावर चढल्याचा आंनद सार्‍या गावाने आपल्या डोळ्यात समाविष्ट केला. या अनोख्या विवाहाची चर्चा तालुक्यात होत आहे.

सद्यस्थितीतील वातावरणात भाउ भावाचा वैरी झाला आहे कधी शेताच्या बांदावरुन तर कधी संपत्ती साठी एकमेकांना मारहाण पर्यंत भाऊबंदकी जाते मात्र याला तिलांजली देत तालुक्यातील नेरी गावात अहीरे कुटुंबातील तिन भावांचे कुटुंब यात एका भावाला अचानक १२ वर्षे पुर्वी पक्षवाताचा झटका आल्याने कायमस्वरूपी अपंगत्व आले. यातच या भावाला मुल बाळ नाही असे असतांना अहीरे कुटुंबाने आपल्या अंपग भावाला आनंदाचा क्षण पुन्हा देण्यासाठी लग्नाच्या २७ वर्षा नंतर पुन्हा नवरदेव म्हणून कैलास धोंडु अहिरे (५२) तर नवरी अनिताबाई कैलास अहिरे (४८) यांना लग्नाच्या बोहल्यावर चढण्यासाठी आग्रह धरला आणि त्यांनी होकार देखील दिला मग काय बौद्ध धर्माच्या रितीरिवाज प्रमाणे हळद लावण्या पासून कार्यक्रम सुरू झाले.

बौद्ध धर्माच्या लग्नाच्या सर्व धार्मिक विधी पार करीत भाउ काशिनाथ अहिरे, विश्वनाथ अहीरे सह पुतणे आंनद अहीरे, शुभम अहीरे सह गावातील सर्वच समाजाच्या ग्रामस्थांनी लग्नाच्या लगभगीत भाग घेतला तर लग्नात खास पाहुणे म्हणून कॉग्रेस अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी हजेरी लावली. लग्नाची संपुर्ण गावाला वेज – नॉनव्हेज चे जेवण खास देण्यात आले. डीजे चे देखील नियोजन करण्यात आले. भावांनी आपली जेमतेम परीस्थिती असतांना लग्नातील केलेला खर्च सारख्यांना अवाक करुन गेला. लग्नाच्या सोहळ्यात अपंग नवरदेवासह नवरीच्या चेहर्‍यावर आनंद दिसत होता, यावेळी राहुल शिंदे, समाधान ढाकरे, सचिन सोनवणे, आतिष निकम आदि उपस्थितीत होते.
या लग्नाला श्रमाचे काम गावातील बंटी भोई, आंनद गोसावी, ज्ञानेश्वर सुरवाडे, आंनद पाटील,यांच्या सह असंख्य हातभार लागले. लग्नात नवरदेव अंपग असल्याने त्यांना खांद्यावर तर नवरी सह प्रमुख पाहुणे सचिन सोमवंशी देखील डीजे च्या तालावर थिरकले. या आगळ्यावेगळ्या विवाहाची चर्चा मात्र तालुक्यात होवु लागली असुन अंपग भावाला आंनद देण्यासाठी भावांनी केलेला खटाटोप बरेच काही सांगून जातो.