“आयतं पोयतं सख्यानं” या एकपात्री नाटकाचे आडळसे येथे आयोजन

“आयतं पोयतं सख्यानं” या एकपात्री नाटकाचे आडळसे येथे आयोजन….!!!!

आडळसे ता.भडगाव (प्रतिनिधी) – प्रगतीशील शेतकरी तथा आडळसे येथील माजी पोलिस पाटील कै.देवराम भिला पाटील (साळुंखे) यांच्या पुण्यतिथीनिमीत्त शिरपूर येथील प्रा.प्रवीण माळी यांचे एकपात्री नाटक “आयतं पोयतं सख्यानं” चे आयोजन करण्यात आले आहे,अहिराणी बोलीचा गंमतीशीर पध्दतीने घेतलेला आढावा प्रेक्षकांना निखळ हास्य चेहाऱ्यावर आणते.अत्यंत मार्मिक व विनोदी शैलीने सादर होणाऱ्या या कार्यक्रमाचे असंख्य प्रयोग पार असतात.
सदर कार्यक्रमाचे आयोजन आदर्श क्रीडा शिक्षक बी.डी.साळुंखे,प्रभाकर साळुंखे,संभाजी साळुंखे,सागर साळुंखे आदिंनी केले आहे,त्यांच्यावतीने पंचक्रोशीतील नागरिकांनी आनंद घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.