पाचोरा तालुक्यातील हर्षिकाने केले वडिलांच स्वप्न पूर्ण
जि.प.प्राथमिक शाळा, मोंढाळे ता पाचोरा जि. जळगाव येथे या शाळेतील शिक्षक कै.जितेंद्र पवार सरांची सुकन्या कु.हर्षिका हिचा MBBS साठी पुणे येथे निवड झाल्या बद्दल स्वर्गवासी वडिलांचे स्वप्न पूर्ण केल्या बद्दल कु.हर्षिका व आई मीना पवार मॅडम यांनी विद्यार्थ्यांना दिवाळीचा फराळ व जिलेबीचे वाटप करण्यात आले. शाळेतील शिक्षकवृंद व ग्रामस्थान्नी कु.हर्षिकाला पुढील भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्यात व शाळेकडून तिचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रम स्थळी श्री.धनराज सर, श्री.नीलकंठ पाटील, श्री.ज्ञानेश्वर आखाडे, श्री.रविंद पाटील, श्री.संदीप जाधव, श्री.पंडीत गायकवाड (उपसरपंच), श्री.संदिप मानकर, श्री.नवीन पाटील (पो.पा.) श्री.एकनाथ सोनवणे (शा.व्य.स. सदस्य) श्री.दिनेश पाटील आदी उपस्थित होते.