श्री. गो.से. हायस्कूल, पाचोरा आयोजित जागरूक पालक, सुदृढ बालक अभियानांतर्गत 0 ते 18 वयोगटातील मुलांची आरोग्य तपासणी

श्री. गो.से. हायस्कूल, पाचोरा आयोजित जागरूक पालक, सुदृढ बालक अभियानांतर्गत 0 ते 18 वयोगटातील मुलांची आरोग्य तपासणी

पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री. गो.से. हायस्कूल, पाचोरा आयोजित जागरूक पालक, सुदृढ बालक अभियानांतर्गत माननीय वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय, पाचोरा यांच्या वतीने 0 ते 18 वयोगटातील मुलांची आरोग्य तपासणी अभियान आज दिनांक. 9.02.2023 वार गुरुवार रोजी लोकप्रतिनिधी म्हणून शालेय समितीचे चेअरमन आदरणीय दादासो. खालील देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली व विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री.एन.आर.पाटील सर यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
मुलांच्या आरोग्य तपासणीसाठी उपस्थित असलेले डॉ.अभिषेक जगताप,डॉ.अर्चना पटवारी, डॉ. शितल वाघ, डॉ.लोकेश सोनवणे, डॉ. वैशाली शिरसाट, डॉ. देवेंद्र पाटील डॉ.शिला पेंटे तसेच अधिपारिचारिक, फार्मासिस्ट,आरोग्य सेविका, तसेच आशा स्वयंसेविका उपस्थित होते. यांचे स्वागत व सत्कार विद्यालयामार्फत करण्यात आले. या कार्यक्रमासाठी शाळेचे शिक्षक श्री.पी.एम. पाटील,श्री. एस.पी.
करंदे, श्री.ए.एस.कुमावत, श्री.विजय पाटील, श्री. रणजित पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.आर.बी. बोरसे सर यांनी केले या कार्यक्रमासाठी शाळेचे सर्व शिक्षक बंधू भगिनी तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.