चोपडा महाविद्यालयातील डॉ.के.डी.गायकवाड व डॉ.एम.एल.भुसारे यांना विद्यापीठाचा ‘उत्कृष्ट संशोधन पुरस्कार’ जाहीर

चोपडा महाविद्यालयातील डॉ.के.डी.गायकवाड व डॉ.एम.एल.भुसारे यांना विद्यापीठाचा ‘उत्कृष्ट संशोधन पुरस्कार’ जाहीर

चोपडा: येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ.सुरेश जी. पाटील महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ.के.डी.गायकवाड यांना उत्कृष्ट संशोधन (पेटंट) बद्दल तसेच मराठी विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉ.एम.
एल. भुसारे यांना उत्कृष्ट संशोधन (पब्लिकेशन्स) या संदर्भातील पुरस्कार कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्यातर्फे जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण दि.११ ऑगस्ट,२०२३ रोजी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथे मा.कुलगुरू महोदयांच्या हस्ते होणार आहे. डॉ.के.डी. गायकवाड यांचे आत्तापर्यंत अनेक शोधनिबंध आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावरील जर्नल्स मधून प्रकाशित झालेले आहेत तसेच त्यांनी संशोधन प्रकल्प देखील पूर्ण केला आहे.आतापर्यंत त्यांची १६ पुस्तके प्रकाशित झाली आहेत.त्याचप्रमाणे डॉ.एम.एल.भुसारे यांचे ४० हून अधिक शोधनिबंध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील जर्नल्स मधून प्रकाशित झाले आहेत. त्याचबरोबर त्यांची आत्तापर्यंत १० पुस्तके व विविध समीक्षणात्मक लेख प्रकाशित झाले आहेत. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ,जळगांव यांच्यातर्फे जाहीर करण्यात आलेल्या या पुरस्कार प्राप्त प्राध्यापकांचा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए. सूर्यवंशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यापरिषदेवर निवड झालेल्या प्रा.डॉ.आर.एम.बागुल यांचाही सत्कार करण्यात आला. याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ.एल.चौधरी, उपप्राचार्य प्रा. एन एस. कोल्हे, समन्वयक डॉ. एस.ए.वाघ, प्रा.डॉ.आर.एम.बागुल, रजिस्टर डी.एम. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ.के.डी.गायकवाड व डॉ.एम.एल.भुसारे यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ऍड.संदीप सुरेश पाटील, संस्थेच्या सचिव डॉ.स्मिताताई संदीप पाटील त्याचप्रमाणे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी, उपप्राचार्य प्रा.डॉ.ए.एल. चौधरी, उपप्राचार्य प्रा.एन.एस.कोल्हे, उपप्राचार्य प्रा.डॉ.के.एन.सोनवणे, समन्वयक डॉ.एस.ए. वाघ, रजिस्ट्रार डी.एम.पाटील यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे. त्यांनी प्राप्त केलेल्या या यशाबद्दल सर्वच स्तरातून त्यांच्या अभिनंदन व कौतुक होत आहे.