पाचोरा मराठा महासंघ कार्यालयात आप्पासाहेब पवार यांना श्रद्धांजली

पाचोरा मराठा महासंघ कार्यालयात आप्पासाहेब पवार यांना श्रद्धांजली

पाचोरा अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. शशिकांत पवार तथा आप्पासाहेब (वय 82) यांचे दिनांक 7 रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. आज दिनांक 9 फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजता पाचोरा येथील अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने आप्पासाहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

मराठा महासंघ कार्यालयात झालेल्या दुखवटा बैठकीत आप्पासाहेबांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. तालुकाध्यक्ष शिवाजी शिंदे यांनी आप्पासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला तर उपस्थितांनी पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले. पाचोरा तालुका अध्यक्ष शिवाजी शिंदे, उपाध्यक्ष प्रा. साहेबराव थोरात, व युवक तालुका अध्यक्ष पत्रकार गणेश शिंदे यांनी आप्पासाहेबांच्या कार्याची माहिती सांगितली.

याप्रसंगी विधी सल्लागार ॲड. सुनील पाटील, तालुका उपाध्यक्ष सुनील देशमुख, तालुका सचिव चंद्रकांत पाटील, जिल्हा प्रतिनिधी राजेंद्र सुखदेव पाटील, युवक कार्याध्यक्ष सचिन संतोष पाटील, युवक सचिव नंदू शेलकर, युवक उपाध्यक्ष चेतन बाळकृष्ण पाटील, सचिन पाटील, आदी समाज बांधव मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

*मराठा समाजावर शोककळा*
अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष शशिकांत पवार (८२) यांचे ता 7 रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. मराठा आरक्षणासाठी लढणारे नेते अशी त्यांची ओळख होती. रत्नागिरी मराठा उद्योजक फोरमच्या बैठकीसाठी ते मुंबईहून तेथे गेले होते. तेथून परत येताना वाटेतच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. बुधवारी सकाळी ११ वाजता दादर येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यामागे पत्नी तसेच वीरेंद्र व योगेश पवार हे दोन मुलगे, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

*आप्पासाहेबांचा अल्प परिचय*
शाहू महाराज, महाराज सयाजीराव गायकवाड आदींच्या पुढाकाराने १९०० च्या आसपास क्षत्रिय मराठा ज्ञाती समाज ही संस्था सुरू झाली. १९८१ मध्ये अखिल भारतीय मराठा महासंघ असे तिचे नाव बदलण्यात आले. मात्र त्यापूर्वीपासून म्हणजे १९६४ पासूनच पवार हे संस्थेत काम करीत होते. अण्णासाहेब पाटील यांच्यानंतर १९९० च्या आसपास पवार यांनीच संस्थेच्या अध्यक्षपदाची धुरा स्वीकारली. मुंबई सेंट्रलच्या मराठा मंदिर या संस्थेमार्फतही त्यांनी विविध उपक्रम राबविले होते. या संस्थेचे ते उपाध्यक्ष होते. वकिली आणि व्यवसाय सोडून पवार यांनी समाजाच्या कामासाठी झोकून दिले व अखिल भारतीय मराठा महासंघ ही संस्था नावारूपाला आणली. ‘मराठा बिझनेसमेन फोरम’ या संस्थेचा पसाराही त्यांनी वाढविला.अखिल भारतीय क्षत्रिय महासभा या संस्थेचे ते राज्य अध्यक्ष होते. तसेच गावदेवीला शारदा शिक्षण सेवा समितीची स्थापना केली.