पाथर्डी पोलिसांनी खांडगाव रस्ता लुटीतील फरार आरोपींच्या कासार पिंपळगाव शिवारात मुसक्या आवळल्या

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा)
खांडगाव,तालुका पाथर्डी,जिल्हा अहिल्यानगर येथील रस्त्यावर दरोडा टाकून लुट करणाऱ्या फरार आरोपीच्या पाथर्डी पोलिसांनी कासार पिंपळगाव शिवारात मुसक्या आवळल्या आहेत.
याबाबतची माहिती अशी की दिनांक ३१/१०/२०२५ रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास त्रिभुवनवाडी ते खांडगाव रोडवर ट्रॅव्हलला पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार आडवी लावून त्या मधिल पाच ते सहा चोरट्यांनी कारमधून खाली उतरून जबरदस्तीने ट्रॅव्हलमध्ये चढून त्यातील प्रवाशांना जीवे ठार मारण्याची धमकी देऊन त्यांच्या जवळ असलेल्या गावठी पिस्तूल व चाकू सारख्या हत्याराचा धाक दाखवून सोन्याचे दागिने व रोख रक्कम जबरदस्तीने काढून नेले आहे. अशा आशयाची फिर्याद पवन सुखदेव खैरनार (वय वर्षे ३६),राहणार साई कृष्णा अपार्टमेंट,प्लाॅट नंबर ७/८, जेलरोड ,नाशिक, जिल्हा नाशिक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर १२२७/२०२५, भारतीय न्याय संहितेचे २०२३ चे कलम ३३१,३१०(२), प्रमाणे दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर गुन्ह्यातील १० संशयित आरोपी हे या पुर्वीच पोलिसा कडून अटक करण्यात आलेले आहेत.त्यातील दोन आरोपी हे फरार झाले होते.सदर गुन्ह्याचा तपास सुरू असताना त्या फरार झालेल्या दोन आरोपीचा पोलीसांनी शोध घेतला असता पाथर्डी पोलिस स्टेशनच्या पोलिस पथकास दिनांक २/२/२०२६ रोजी सदर गुन्ह्यातील फरार आरोपी हा कासार पिंपळगाव शिवारात आला असल्याची पक्की माहिती मिळाली होती.मग पाथर्डीचे पोलिस पथक हे तात्काळ कासार पिंपळगाव शिवारात हनुमान टाकळी ते जवखेडे रोडने गेले असता संशयित आरोपीस पोलीसांची चाहूल लागताच तो पोलीसांना पाहून पळत असताना पोलिस पथकाने त्याचा पाठलाग करून त्याला रंगेहाथ पकडून ताब्यात घेऊन त्याचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव आकाश उर्फ गुल्या अनिल वांढेकर,(वय वर्षे २३), राहणार,मोहोज खुर्द,तालुका पाथर्डी,जिल्हा अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले. पोलीसांनी ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीची बारकाईने चौकशी केली असता त्याने वरील गुन्हा केला असल्याचे कबूल केले होते.पोलिस पथकाने ताब्यात घेतलेल्या आरोपी वर पाथर्डी पोलिस स्टेशनमध्ये काही गुन्हे दाखल आहेत का हे तपासून पाहिले असता त्यांनी पाथर्डी पोलिस स्टेशनमध्ये त्याच्या विरोधात गुन्हा रजीस्टर नंबर [१] ९१२/२०२५ भारतीय न्याय संहितेचे कलम ३०९(४),[२] गुन्हा रजिस्टर नंबर ११३५/२०२५, भारतीय न्याय संहितेचे कलमं ३०३(२),[३] गुन्हा रजिस्टर नंबर १२१३/२०२५ भारतीय न्याय संहितेचे कलम ३०९(४),[४] गुन्हा रजिस्टर नंबर १२२७/२०२५, भारतीय न्याय संहितेचे कलमं ३१०(२) प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचे उघडकीस आले आहे.सदरची कारवाई ही अहिल्यानगर जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे साहेब,अप्पर पोलीस अधिक्षक वैभव कलबुर्मे साहेब, शेवगाव विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी निरज राजगुरू साहेब, यांच्या मार्गदर्शनाखाली पाथर्डी पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक विलास पुजारी साहेब,सहायक पोलिस उपनिरीक्षक नितीन दराडे, पोलिस हेड कॉन्स्टेबल बाबासाहेब बडे, पोलिस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर ईलग, संजय जाधव,सागर बुधवंत,पोलिस कॉन्स्टेबल रविंद्र चव्हाण यांच्या पोलिस पथकाने केली आहे.सदर सराईत गुन्हेगारी टोळीच्या या भागात अनेक कारवाया सुरू होत्या.ही पकडलेली गुन्हेगारी टोळी ही अनेक राजकीय पुढाऱ्यांच्या गुप्त बैठकीत हजर रहात असत.पाथर्डी तालुक्याच्या पश्चिम भागात या टोळीने चांगलेच आपले साम्राज्य निर्माण केले होते. परंतु पोलिसांनी यांच्या नांग्या ठेचून सुता सारखे सरळ केले आहेत. या टोळीने कोल्हार घाटातही अनेक प्रवाशांना लुटले आहे अशी दबक्या आवाजात सर्वत्र चर्चा ऐकू येत आहे.पाथर्डी तालुक्यातील गुन्हेगारी मोडून काढण्याचा पोलिस निरीक्षक विलास पुजारी साहेब यांनी विडाच उचलला आहे.

























