खान्देश चे रांगोळी कलावंत शैलेश कुलकर्णी थेट महाराष्ट्राच्या लाडक्या दूरदर्शन सह्याद्री प्रादेशिक वाहिनीवर

खान्देश चे रांगोळी कलावंत शैलेश कुलकर्णी थेट महाराष्ट्राच्या लाडक्या दूरदर्शन सह्याद्री प्रादेशिक वाहिनीवर

पाचोरा येथील कला शिक्षक , चित्रकार , रांगोळीकार शैलेश कुलकर्णी यांची काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या लाडक्या सह्याद्री वाहिनीवरील “बियॉंड द थॉट” या सुप्रसिद्ध कार्यक्रमासाठी रांगोळीकार म्हणून निवड झाली होती. या मध्ये त्यांच्या कलाकृती व त्या कलाकृतीं चा प्रवास सांगितलेला आहे. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दिनांक २० नोव्हेंबर २०२१ वार शनिवार या दिवशी सायंकाळी ७.३० वाजता तसेच रात्री १० वा. व पुनः प्रक्षेपण २१ नोव्हेंबर २०२१ रोजी दुपारी १.३० वा. होणार आहे. खान्देशातून या कार्यक्रमासाठी निवड होणारे ते सर्वप्रथम कलाकार होय हे विशेष. कलाशिक्षक शैलेश कुलकर्णी हे सर जे जे कला महाविद्यालय मुंबई येथील माजी विद्यार्थी असून खान्देशातील प्रसिद्ध रांगोळीकार म्हणून सर्वपरिचित आहे. घरापुढील काढली जाणारी रांगोळी एका कलाकाराला राष्ट्रीय पातळपर्यंत घेऊन जाऊ शकते , हे आपल्याला कळते. त्यांना आता पर्यंत बऱ्याच पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे तसेच त्यांनी विविध राज्य, राष्ट्रीय स्पर्धांमध्ये बक्षिसे मिळाली असून रांगोळी कले बरोबर त्यांनी चित्रकलेमध्ये देखील राष्ट्रीय स्तरावर विशेष प्रावीण्य प्राप्त केले आहे.

आपण सर्व कलारासिकांचे प्रेम आणि पाठिंब्याने एक नवीन ऊर्जा मिळते व आज पर्यंत मिळालेले यश हे आपण सर्वांच्या आशीर्वादाने द्विगुणित होत आहे…यापुढे देखील माझ्या पाचोरा तालुक्याचे नाव तसेच जळगाव व त्याबरोबर च खान्देश चे नाव आपण सर्वांच्या सहकार्याने जागतिक स्तरावर घेऊन जाईल,अशी खात्री देतो.

ही माहिती जास्तीत जास्त खान्देशातील कलारासिकांपर्यंत तसेच अधिकाधिक ग्रुप वर जास्तीत जास्त शेअर करूया

आपला नम्र,
शैलेश कुलकर्णी,पाचोरा जिल्हा जळगाव
8446932849