महाराष्ट्र खो-खो असोसिएशनची राज्य खो खो पंच परीक्षा २९ जूनला 

महाराष्ट्र खो-खो असोसिएशनची राज्य खो खो पंच परीक्षा २९ जूनला

 

मुंबई,दि. २३ जून, (क्री. प्र.),महाराष्ट्र खो खो असोसिएशनने या वर्षी राज्य खो खो पंच परीक्षा दि २९ जून रोजी सकाळी १०:०० वाजत आयोजित केली आहे. महाराष्ट्रात एकाच वेळी विविध जिल्ह्यांमध्ये परीक्षा होणार आहे.संपूर्ण राज्यात जवळ जवळ १५ केंद्रावर ही परीक्षा होणार असून ज्या जिल्ह्यात परीक्षा होणार आहे त्या जिल्ह्यात पंच वर्ग होत आहेत. ही राज्य पंच परीक्षा मुंबई, पुणे, बीड, सिंधुदुर्ग, नांदेड, धुळे, ठाणे, नंदुरबार, पालघर, सोलापूर, जालना, सांगली, लातूर व अहिल्यानगर येथे पार पडणार आहे असे महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे सरचिटणीस प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव यांनी स्पष्ट केले आहे.

 

मुंबई जिल्ह्यात ही परीक्षा बीपीएड कॉलेज, वडाळा येथे दि २९ जून रोजी सकाळी ठीक १०.०० वाजता होणार असून अधिक माहितीसाठी मुंबई खो-खो संघटनेचे प्र. कार्यवाह सुरेंद्र विश्वकर्मा यांच्याशी संपर्क साधण्याचे आव्हान त्यांनी केले आहे.

 

तसेच इतर संबंधित जिल्ह्यात त्या जिल्ह्याच्या सचिवांशी संपर्क साधण्याचे आव्हान कार्यालयीन सचिव प्रशांत इनामदार यांनी केले आहे.