नाशिक विभागीय कुस्ती स्पर्धेत धीरज पाटील विजयी,तर कृष्णा पाटील उपविजयी तसेच अक्षय माळी तृतीयस्थानी

नाशिक विभागीय कुस्ती स्पर्धेत धीरज पाटील विजयी,तर कृष्णा पाटील उपविजयी तसेच अक्षय माळी तृतीयस्थानी….!!!!_

भडगाव (प्रतिनिधी) –
कर्मवीर तात्यासाहेब हरि रावजी पाटील,किसान शिक्षण संस्था,भडगाव,संचलीत,गोपीचंद पुना पाटील,विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,कोळगाव ता.भडगाव येथील इयत्ता अकरावीचा विद्यार्थी तथा पैलवान धीरज शरद पाटील याने मुलांच्या १७ वर्षाआतील ५१ किलो वजनी गटात,क्रीडा व युवक सेवा संचालनालय तथा धुळे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे,जिल्हा क्रीडा संकुल,धुळे येथे आयोजीत विभागस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत विजेतेपद प्राप्त केले तो राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे,धीरजशिवाय ४५ किलो वजनी गटात पैलवान कृष्णा सुनिल पाटील याने अंतिम फेरीत अतिशय चुरशीची लढत देत उपविजेतेपद प्राप्त केले आहे तर ७१ किलो वजनी गटात पैलवान अक्षय भगवान माळी याने तृतीयस्थान प्राप्त केले आहे.
धीरज,कृष्णा तसेच अक्षय या त्रिकूटास आदर्श क्रीडा शिक्षक बी.डी.साळुंखे,प्रा.सतीश पाटील,पैलवान शरद पाटील,पैलवान सुनिल पाटील,बापू पैलवान,पैलवान अनिल बिऱ्हाडे तसेच राष्ट्रीय खो-खो पंच प्रा.प्रेमचंद चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले.
धीरज,कृष्णा व अक्षय यांच्या यशाबद्दल नाशिक विभागाच्या क्रीडा उपसंचालिका सुनंदा पाटील,धुळे कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष सुनिल चौधरी,संस्थेचे चेअरमन प्रतापराव पाटील,सचिव डॉ.पुनमताई पाटील,मंत्रालयीन उपसचिव प्रशांतराव पाटील,माजी नगराध्यक्ष शामकांत पाटील,माध्यमिक सोसायटी संचालक जगदीश पाटील,प्राचार्य सुनिल पाटील,पर्यवेक्षक अनिल पवार,प्र.प्राचार्य संदीप बाविस्कर,क.म.कार्यवाहक रघुनाथ पाटील तसेच महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर बंधु-भगिनी यांनी अभिनंदन करुन पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

(फोटो कॕप्शन – धीरज पाटील,कृष्णा पाटील व अक्षय माळी यांचे कौतुक करताना धुळे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष सुनिलभाऊ चौधरी,बी.डी.साळुंखे,प्रा.प्रेमचंद चौधरी,शरद पैलवान,सुनिल पैलवान,बापू पैलवान आदि….)