पाचोरा वनविभागाची मोठी कामगिरी – कुरंगी येथे दहशत माजवलेल्या हल्लाखोर वानरांना पकडण्यात अखेर आले पथकाला यश

पाचोरा वनविभागाची मोठी कामगिरी – कुरंगी येथे दहशत माजवलेल्या हल्लाखोर वानरांना पकडण्यात अखेर आले पथकाला यश

निसर्गराजा न्युज संपादक आतिषजी चांगरे यांनी हल्लाखोर वानराला पकडण्यासाठी घेतली मोठी मेहनत- तब्बल दोन तास सुरू राहिली मोहिम

पाचोरा प्रतिनिधी : गेल्या तीन महिन्यांपासुन कुरंगी गावात हल्लाखोर वानराने १०० च्या वर दुचाकी गाड्यांचे नुकसान केले होते.एवढेच नव्हे तर तो मागील ८-१० दिवसांपासुन गावातील नागरीक व महिला आणि लहान मुलांवर हल्ला चढवत जवळपास १५-२० लोकांवर हल्ला केल्याने एकच दहशत परीसरात माजली होती.हे वानर आल्यानंतर एकच कल्लोळ आणि धुमाकूळ माजली होती.

शेवटी वनविभागाचे कर्तव्यदक्ष अधिकारी देवरे साहेब यांनी अजयकुमार जैस्वाल यांनी फोन करून सुचना दिल्यानंतर आपल्या पथकासह गावात दाखल होऊन आज निसर्ग राजा न्युज चे संपादक आतिषजी चांगरे यांच्या मेहनती नंतर तब्बल दोन तासानंतर हल्लाखोर दोन वानरांना पकडण्यात फार मोठे यश आले असुन – या कामगिरीनंतर कुरंगीकरांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.समस्त कुरंगी नागरीकांतर्फे आतीष’जी चांगरे आणि वनविभागाचे अधिकारी देवरे साहेब व त्यांचे पथकातील सदस्य – अभिनंदन व कौतुक करण्यात आले.