प्रा डॉ.अस्मिता फाउंडेशन तर्फे सामनेर लासगाव येथील महिलांकरता हळदी कुंकवाचा कार्यक्रम उत्साहात साजरा

प्रा डॉ.अस्मिता फाउंडेशन तर्फे सामनेर लासगाव येथील महिलांकरता हळदी कुंकवाचा कार्यक्रम उत्साहात साजरा

(पाचोरा प्रतिनिधी अनिल आबा येवले)
पाचोरा येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ अस्मिता पाटील यांनी मकर संक्रांत निमित्त महिलांसाठी हळदी कुंकू चा कार्यक्रम घेऊन महिलांमध्ये जनजागृती निर्माण केली पाचोरा येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ अस्मिता पाटील यांनी महिलांकरता अनेक चांगले उपक्रम राबवलेले असून मागील काळात त्यांनी पाचोरा येथे हजारो महिलांना साडी वाटप करून एक चांगला उपक्रम राबवला होता त्यांनी अनेक विविध पद त्यांना मिळालेले असून त्यांनी महिलांकरता त्या पदांमार्फत न्याय दिला आहे सौ अस्मिता पाटील या पाचोरा पीपल बँकेच्या संचालिका असून त्यांनी विविध पक्षात राहून दिलेल्या जबाबदाऱ्या पार पडत होत्या कुठलेही मोठी आशा न ठेवता त्यांनी कार्य केले आहे त्यांचे स्वतःचे कॉलेज असून त्या कॉलेज मार्फत विद्यार्थी व विद्यार्थिनींना न्याय दिलेला आहे नुकतीच त्यांच्या हातून माहि जी यात्रा येथे देवी माता चे पूजन करण्यात आले होते त्या ठिकाणी त्यांनी महिलांसोबत नृत्य करून महिलांमध्ये उत्साह निर्माण केला होता त्यांच्याकडे महिलांचे संघटन असून महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमी तत्पर असतात नुकताच त्यांनी सामनेर येथील शाळेत महिलांकरता हळदी कुंकवाचा कार्यक्रम महिलांमध्ये जनजागृती करून महिलांनीही सर्व ठिकाणी पुढे यावे नारी मध्ये जी शक्ती आहे ती प्रचंड असून आपण त्याचा चांगला उपयोग करून घ्यावा या हळदी कुंकाच्या कार्यक्रमाच्या वेळी सामनेर लाजगाव व त्याच्या आजूबाजूच्या परिसरातील हजारो महिला उपस्थित होत्या त्या परिसरात हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेऊन सौ अस्मिता पाटील यांनी महिलांना एकत्र जमवून आनंद साजरा केला यावेळी त्यांच्यासोबत सौ अलका पाटील सौ उषा पाटील तसेच अनेक महिला उपस्थित होते