गरीब नवाज फाउंडेशन द्वारे एस एस सी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे गौरव

गरीब नवाज फाउंडेशन द्वारे एस एस सी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे गौरव

पाचोरा तालुक्यात उर्दू माध्यमातून एसएससी मध्ये प्रथम येणारे विद्यार्थ्यांचे जिल्हा परिषद उर्दू कन्या शाळा पाचोरा येथे गरीब नवाज फाउंडेशन नगरदेवळा मार्फत गौरव करण्यात आला. यावेळी गरीब नवाज फाउंडेशन नगरदेवळा चे अध्यक्ष तसेच शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष शेख अफरोज रहीम उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी गोराडखेडा उर्दू केंद्राचे केंद्रप्रमुख शेख सलाउद्दीन गौस हे उपस्थित होते. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे गरीब नवाज फाउंडेशन द्वारे पुष्प व बक्षीस देऊन गौरव करण्यात आला. नगरदेवळा येथील एस एस के पवार हायस्कूल मध्ये उर्दू माध्यमातून प्रथम क्रमांक येणारे शेख रिजवान शेख रजाक (89.60%) द्वितीय क्रमांक तनवीर बेग अजीज बेग (86%) , तिसरा क्रमांक शेख मोईस शेख अनिस (81%) यांचे ,केंद्रप्रमुख साहेबांचे हस्ते सत्कार करण्यात आला.पाचोरा शहराची प्रतिष्ठित संस्था अँग्लो उर्दू हायस्कूल मध्ये प्रथम येणारे आवेश झियाऊल्हक व उझमा शेख खलील तसेच नवीन उर्दू हायस्कूल पाचोरा येथून प्रथम येणारी नाजमीन बी शेख सादिक (87%) यांचाही गौरव करण्यात आला.यावेळी ” तालीम की अहमियत” या विषयावर पदवीधर शिक्षक शेख कदिर शेख शब्बीर ,उपशिक्षक शेख जावेद रहीम, व उप शिक्षक आसिफ जलील सर यांनी प्रकाश टाकला. केंद्र प्रमुख सलाउद्दिन सर यांनी असाच प्रमाणे यश मिळवून देश व समाजाची सेवा करावी व कठीण परिश्रम,सातत्यला आपली सवये बनवावी असे विद्यार्थ्यांना आवाहन केले. केन्द्र प्रमुख साहेबांनी शिक्षण शेत्रात काम करणारी गरीब नवाज फाऊंडेशन चे कौतुक केले व असाच प्रमाणे विद्याथ्र्यांचा मनोबल वाडवण्या साठी अन्य फाऊंडेशन यांनीही पुढे यावे असे सांगितले.या वेळी एस एस के पवार हायस्कूलचे प्रयत्नशिल शिक्षक शेख अहतेशामोद्दीन अलाउद्दीन सर यांचे आदर्श शिक्षक म्हणून गरीब नवाज फाऊंडेशन द्वारे सत्कार करण्यात आला.या दिवशी शिक्षण परिषद होती. कार्यक्रमांमध्ये तालुक्याचे जिल्हा परिषद उर्दू शाळेचे सर्व शिक्षक उपस्थित होते.