गोराडखेडा येथील गोराडेश्वर महादेव मंदिरावर गुढीपाडव्यानिमित्त उभारली गुढी

गोराडखेडा येथील गोराडेश्वर महादेव मंदिरावर गुढीपाडव्यानिमित्त उभारली गुढी

येथील गोराडेश्वर महादेव मंदिरावर भाविकांमार्फत गुढी उभारून पाडवा उत्सव साजरा करण्यात आला. गेल्या दोन वर्षांपासून करुणा महामारीने संपूर्ण जगाला ग्रासलेले होते त्यामुळे कोणताही सण साजरा होत नव्हता व सर्वत्र भीतीच्या वातावरणात समाज दुरावलेला होता. मात्र गेल्या काही महिन्यांपासून कोरोणा रूग्णांची संख्या घटल्याने शासनाने सर्व निर्बंध शिथिल करत सण उत्सव पारंपरिक पध्दतीने साजरा करण्याची मुभा दिली आहे. त्याच पार्श्वभूमीवर गोराडखेडा येथील महादेव मंदिरावर भाविकांमार्फत पारंपरिक व भगव्या पताकांची गुढी उभारून महादेवाचे विधिवत अभिषेक व पूजन करून पाडवा साजरा करण्यात आला. त्यासोबतच नवीन वर्षांत कोरोणासारख्या जागतिक महामारीपासून सर्वांचे रक्षण करत समाजात सुख व संपन्नता लाभू देण्याचे साकडे महादेवाला घालण्यात आले.