तळई येथे वीज पडून मृत्यू पावलेल्या मुलांच्या कुटूंबियांचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले सात्वंन

तळई येथे वीज पडून मृत्यू पावलेल्या मुलांच्या कुटूंबियांचे
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले सात्वंन

जळगाव, दि. 11 – एरंडोल तालुक्यातील तळई येथे वीज पडून मृत्यू पावलेल्या भुषण पाटील आणि विक्रम चौधरी यांच्या कुटूंबियांची आज राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भेट घेऊन सात्वंन केले व दु:ख ही व्यक्त केले.
भूषण पाटील आणि विक्रम चौधरी यांचा मृत्यु दुर्देवी असून त्यांच्या कुटूंबियांना शासनामार्फत सर्वतोपरी मदत केली जाईल असे आश्वासन देऊन त्यांनी दोघाही कुटूंबियांना आवश्यक ती मदत तातडीने करण्याचे निर्देश एरंडोलचे प्रांताधिकारी विनय गोसावी आणि तहसीलदार अर्चना खेतमाळीस यांना दिले.
याप्रसंगी पालकमंत्र्यांसमवेत पंचायत समिती सभापती रोकडे, उपसभापती अनिल महाजन, प्रांताधिकारी विनय गोसावी, तहसीलदार अर्चना खेतमाळीस, वासुदेव पाटील, जगदीश पाटील, हिम्मतराव पाटील, रवींद्र चौधरी, ओंकार पाटील, तळईचे सरपंच संभाजी वाघ, ग्रामपंचायत सदस्य रतन पाटील, पोपटराव पाटील यांच्यासह भूषण आणि विक्रमचे कुटूंबिय व ग्रामस्थ उपस्थित होते.