श्री.गो.से.हायस्कूल मध्ये कर्तव्यपूर्ती सोहळा उत्साहात संपन्न
पा.ता.सह.शिक्षण संस्थेच्या श्री.गो.से.हायस्कूल. पाचोरा मध्ये आज दिनांक 28 /2 /2026 शनिवार रोजी किमान कौशल्य विभागातील ज्येष्ठ शिक्षक श्री. डी.व्ही .पाटील व नाईक पदावर कार्यरत असलेले श्री.संजय वामन पाटील. या दोघांचा सेवापूर्ती समारंभ कलादालन मध्ये संपन्न झाला.
या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष तथा पाचोरा-भडगाव तालुक्याचे माजी आमदार भाऊसो.दिलीप भाऊ ओंकार वाघ, चेअरमन नानासो संजय जी वाघ, शालेय समितीचे चेअरमन दादासाहेब खलील देशमुख, ज्येष्ठ संचालक श्री.सतीश नारायण चौधरी, श्री.योगेश माधवराव पाटील,पिंपळगाव-हरेश्वर येथील प्रगतशील शेतकरी श्री.प्रकाश पाटील व विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.एन.आर.पाटील. व उपमुख्याध्यापक श्री.आर.एल.पाटील.उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात श्री.रुपेश पाटील यांनी इशस्तवनाने केली. श्री.डी व्ही पाटील सर व संजय वामन पाटील या दोघांचा विद्यालयाच्या वतीने सपत्नीक शाल, श्रीफळ व ड्रेस देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
मुख्याध्यापक श्री.एन.आर.पाटील सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तसेच उपमुख्याध्यापक श्री.आर.एल.पाटील.यांनी दोघांच्या कार्याचा सविस्तर आढावा घेतला.त्यानंतर किमान कौशल्य प्रमुख श्री. मनीष बाविस्कर यांनी श्री. डि.व्ही.पाटील सर यांच्या शैक्षणिक कार्याचा आढावा घेतला.
संस्थेचे अध्यक्ष श्री भाऊसो दिलीप ओंकार वाघ यांनी दोघांच्या कार्याबद्दल गौरवद्वार करून शुभेच्छा दिल्या.अध्यक्षीय भाषणात शालेय समितीचे चेअरमन दादासो खालील देशमुख यांनी डि.व्ही.पाटील सर व संजय वामन पाटील यांनी केलेल्या सेवेबद्दल गौरवोद्गार काढून समाधान व्यक्त केले.
या सत्कार सोहळ्यास उत्तर देताना श्री. डि.व्ही. पाटील सर यांनी संस्थेने वेळोवेळी केलेल्या सहकार्याबद्दल ऋण व्यक्त करून याही पुढे संस्थेसाठी काम करण्यासाठीचे अभिवचन दिले. श्री. संजय वामन पाटील यांच्या मुलगा सोहम पाटील याने आपल्या वडिलांच्या सेवापुर्ती निमित्त संस्थेचे ऋण व्यक्त करून वडिलांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली.
या कार्यक्रमास माजी पर्यवेक्षक श्री.शांताराम चौधरी, श्री. ए.जे.महाजन. तसेच सकाळ व दुपार क्षेत्रातील सर्व शिक्षक बंधू -भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सेवापूर्ती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री. महेश कौडिण्य सर यांनी केले.






















