चोपडा महाविद्यालयातील दोन विद्यार्थ्यांचे सीए परीक्षेत यश

चोपडा महाविद्यालयातील दोन विद्यार्थ्यांचे सीए परीक्षेत यश

चोपडा:येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयातील वाणिज्य विभागाच्या दोन विद्यार्थ्यांनी नोव्हेंबर २०२२ मध्ये इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया या संस्थेतर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेत यश प्राप्त केलेले आहे. या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला.या परीक्षेत महाविद्यालयातील अग्रवाल पार्थ महेश व सुशील रघुवीर भाट या दोन विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या या परीक्षेत या दोन विद्यार्थ्यांनी यश मिळवून यशाची परंपरा निर्माण केली आहे.
त्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अॅड. संदीप सुरेश पाटील तसेच संस्थेच्या उपाध्यक्षा श्रीमती आशाताई पाटील, सचिव डॉ.सौ. स्मिताताई संदीप पाटील त्याचप्रमाणे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी, उपप्राचार्य प्रा.डॉ.ए. एल.चौधरी,उपप्राचार्य श्री.एन.एस.कोल्हे, उपप्राचार्य प्रा.डॉ.के.एन.सोनवणे यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांना वाणिज्य विभाग प्रमुख डॉ.सी.आर.देवरे व इतर सहकारी स्टाफ यांचे मार्गदर्शन लाभले.