पाचोऱ्यात भाजपा ने काढली ठाकरे सरकारची अंत्ययात्रा अधिवेशनातील १२ आमदारांचे निलंबन म्हणजे लोकशाहीची हत्या- अमोल शिंदे

पाचोऱ्यात भाजपा ने काढली ठाकरे सरकारची अंत्ययात्रा
अधिवेशनातील १२ आमदारांचे निलंबन म्हणजे लोकशाहीची हत्या- अमोल शिंदे

पाचोरा-
काल दि. ५ जुलै रोजी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाची आक्रमक सुरूवात झाली. त्यात भाजपा नेते आमदार गिरीश महाजन यांच्यासह १२ आमदारांचे निलंबन करण्यात आले.त्याचे पडसाद पाचोऱ्यात देखील उमटले असून भारतीय जनता पार्टी चे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांच्या नेतृत्वात निषेध आंदोलन करत ठाकरे सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून जोरदार घोषणाबाजी करत ही अंतयात्रा ‘अटल’भारतीय जनता पार्टी कार्यालय पासून छत्रपती शिवाजी महाराज चौकात काढण्यात आली होती. चौकात सर्व भाजपा पदाधिकारी लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला यावेळी अमोल शिंदे यांनी बोलताना सांगितले की आधी मराठा समाजाचे आरक्षण या सरकारने घालवले त्यानंतर आता ओबीसी समाजाचे सुध्दा राजकीय आरक्षण ह्या नाकर्त्या सरकारने घालवले आहे.त्याचा निषेध करण्यासाठी आमचे नेते आमदार गिरीश महाजन यांच्यासह १२ आमदार यांनी विधानसभेच्या तालिका अध्यक्षांकडे विचारणा करण्यासाठी वेल मध्ये गेले असता,विरोधकांनी आरक्षणावर कुठलीही ठोस भूमिका घेण्याऐवजी उलट आमदार गिरीश महाजन यांच्यासह भाजपच्या १२ आमदारांवर १ वर्षासाठी निलंबनाची कारवाई करत ह्या दळभद्री ठाकरे सरकारने एका प्रकारे संसदीय लोकशाहीची हत्याच केली आहे.व हिटलरशाही पद्धत या सरकारने महाराष्ट्रात सुरू केली आहे.परंतु मराठा व ओबीसी समाज खूप सुज्ञ आहे.या सरकारचे आरक्षण न देण्याचे धोरणाला ते जाणून आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात मराठा व ओबीसी समाज या सरकारमधील मंत्र्यांना व आमदारांना रस्त्यावर देखील फिरू देणार नाहीत.इतका प्रचंड रोष या सरकार विषयी जनसामान्यांमध्ये निर्माण झाला आहे.तसेच एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण होऊन देखील मुलाखतीस वर्षानुवर्ष दिरंगाई होत असल्याने कालच विद्यार्थी स्वप्नील लोणकर या तरुणाने आत्महत्या केली या राज्यामधील तरुणांचे देखील भविष्य आणि तालिबानी सरकारने उध्वस्त करण्याचे काम सुरू केले आहे.असे भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी बोलताना सांगितले.याप्रसंगी भाजपा जिल्हा सरचिटणीस तथा जि.प.सदस्य मधुकर काटे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सतीश शिंदे,विधानसभा क्षेत्रप्रमुख हिम्मतसिंग निकुंभ,पंचायत समिती सभापती वसंत गायकवाड,शहराध्यक्ष रमेश वाणी,तालुका सरचिटणीस गोविंद शेलार,संजय पाटील,शहर सरचिटणीस दीपक माने,राजेश संचेती,भाजयुमो तालुकाध्यक्ष मुकेश पाटील,शहराध्यक्ष समाधान मुळे,भाजपा तालुका उपाध्यक्ष प्रमोद सोमवंशी,महेश पाटील,किरण पाटील,राहुल गायकवाड योगेश ठाकूर,कुमार खेडकर योगेश पाटील,किरण पाटील,शरद पाटील,प्रवीण पाटील,सुनील पाटील,विजय राठोड,परेश पाटील,नीतू नाना पाटील,अनिल शिंदे,रवींद्र पाटील,योगेश चौधरी,लकी पाटील,प्रवीण पाटील,भुषण पाटील,जितू पाटील,विरेंद्रा चौधरी,विकी बाविस्कर,जगदीश पाटील,रवी पाटील,बाळू धुमाळ, गणेश परदेशी,संजय पाटील, गजानन माळी,जगदीश राठोड, हेमंत पाटील,अनिल परदेशी, देवीलाल परदेशी,दगा तडवी, मस्तान तडवी,गोकुळ दारकुंडे, राजेंद्र पाटील,तुकाराम मिस्त्री, अरुण राठोड,समाधान राठोड, ईश्वर जाधव,अनिल पवार, रतिलाल चव्हाण,विशाल पवार, जितेंद्र राठोड,उमेश पाटील,भैय्या पाटील,चंदू चव्हाण,अनिल परदेशी,अमोल पाटील,संदीप पाटील,राहुल महाजन,सागर महाजन,ललित महाजन,विजय चौधरी,शाहरुख शेख,रुपेश परदेशी,मयूर शेलार,सचिन पाटील,वाल्मिक माने,हिरामण भोसले,सोनू पाटील,राजू सोनवणे,कपिल पाटील,शुभम पाटील,शुभम नागणे,राकेश पाटील,पप्पू पाटील,दिनेश नागणे,गोलू चौधरी,करण भोई, मंगेश भोसले,कुणाल मोरे,रोहन मिश्रा आदी उपस्थित होते.