अखिल भारतीय मराठा महासंघ तसेच महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक संघ जळगाव आयोजित मासाहेब जिजाऊ जयंती सप्ताह निमित्त तालुक्यातील सर्व विद्यालयात वक्तृत्व स्पर्धा

अखिल भारतीय मराठा महासंघ तसेच महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक संघ जळगाव आयोजित मासाहेब जिजाऊ जयंती सप्ताह निमित्त तालुक्यातील सर्व विद्यालयात वक्तृत्व स्पर्धा

पाचोरा तालुका प्रतिनिधी श्री राजेंद्र खैरनार

अखिल भारतीय मराठा महासंघ तसेच महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक संघ जळगाव आयोजित मासाहेब जिजाऊ जयंती सप्ताह निमित्त तालुक्यातील सर्व विद्यालयात वक्तृत्व स्पर्धा एकपात्री नाटिका विषय क्रांतीज्योती सावित्रीबाई तसेच आऊसाहेब जिजाऊ आधारित अ ब क गटात घेण्यात आल्या यात पी के शिंदे माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन तब्बल 89 विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले त्यात परीक्षकांनी,( श्री डी ए पाटील सर) व आहेर मॅडम यांनी नि पक्षपातीपणे निवडक विद्यार्थ्यांचे अंतिम टप्प्यासाठी निवड केली त्यात प्रथम इशिता देविदास सपकाळ तसेच कावेरी विजय पाटील कृतिका महेश देशमुख तोषाली विकास गीर गोसावी मिताली प्रणय पुजारी या बक्षीस पात्र विद्यार्थिनींनी उत्कृष्ट भूमिका केली या विद्यार्थिनींना राजीव गांधी टाऊन हॉल येथे स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन संघ समितीने गौरव केला तसेच विद्यालयाच्या वतीने अध्यक्ष तात्यासाहेब पंडितराव शिंदे सचिव आदरणीय भैय्यासाहेब काटकर सहसचिव आदरणीय नीरज दादा मुनोत तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री एस व्ही गीते सर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले यात सर्व शिक्षक यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.