केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी निर्णयाच्या निषेधार्थ पाचोरा येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तर्फे उद्या एकदिवसीय धरणे आंदोलन

केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी निर्णयाच्या निषेधार्थ पाचोरा येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तर्फे उद्या एकदिवसीय धरणे आंदोलन

पाचोरा (प्रतिनिधी) – केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी निर्णयाच्या निषेधार्थ पाचोरा येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तर्फे दि.३ फेब्रुवारी २०२३ रोजी तहसील कार्यालय पाचोरा येथे सकाळी १० ते सायं ५ या वेळेत शिवसेना नेत्या वैशालीताई सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे यात विविध शेतकरी हिताच्या मागण्या सरकारकडे केले जाणार आहे.

या आंदोलनात कापसाला प्रतिक्विंटल दहा हजार भाव मिळावा, सोयाबीन तूर सूर्यफूल पिकाला प्रतिक्विंटल 8000 रुपये मिळावा, पंतप्रधान पिक विमा योजनेतून योग्य नुकसान भरपाई मिळावी, पाचोरा-भडगाव तालुक्यात सततच्या पावसामुळे झालेल्या पिकांची नुकसान भरपाई अनुदान मिळावे, शेतीपंपासाठी दिवसा पूर्ण दाबाने आठ तास वीज पुरवठा मिळावा, शेतीपंपाची मागील वीज बिलांची संपूर्ण माफी मिळावी, पाचोरा भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी पोखरा योजना लागू करण्यात यावी, शेतकऱ्यांचे शेती कर्ज देण्यासाठीची सिबिल स्कोर ची रद्द करण्यात यावी, सेबीच्या मार्फत शेतमालाची वायदे बाजारात केलेली बंदी ताबडतोब उठवावी, शेतीला उद्योगाचा दर्जा द्यावा, प्रोत्साहन पर अनुदान पात्र शेतकऱ्यांना लवकर मिळावे त्यासाठी मागील सरकारच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करावी, जंगली जनावरांपासून शेतकऱ्यांच्या शेतमालाचे नुकसानपोटी शासनाकडून भरीव नुकसानभरपाई मिळावी व 100% अनुदानावर सौर कुंपण योजना अंमलात आणावी, फळबागांचे मागील वर्षाची अतिवृष्टी झालेली नुकसान ची भरपाई रक्कम ताबडतोब मिळावी, मुख्यमंत्री सौर योजना व पंतप्रधान कुसुम सोलर योजनेची व्याप्ती वाढवून मागणी करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला मोफत सोलर पंप योजनेचा लाभ द्यावा, रोजगार हमी योजनेअंतर्गत केळी पिकासाठी मिळणारी रक्कम 3 वर्ष ऐवजी 2 वर्ष करावी आदी मागण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. तरी या आंदोलनात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपल्या मागण्या शासन दरबारी पोहचवण्यासाठी सहभागी व्हावे असे आवाहन शिवसेना (उबाठा),युवासेना, शेतकरी सेना तर्फे करण्यात आले आहे.