जिजाऊ जन्मोत्सव स्पर्धेत श्री. गो.से.हायस्कूलचे यश

जिजाऊ जन्मोत्सव स्पर्धेत श्री. गो.से.हायस्कूलचे यश.

पाचोरा (प्रतिनिधी)
अखिल भारतीय मराठा सेवा संघ व महात्मा फुले शिक्षक परिषद पाचोरा यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित जिजाऊ जन्मोत्सव वकृत्व स्पर्धेत आपल्या शाळेतील इ.9 वी क ची विद्यार्थिनी कु.कोमल महाजन हिने तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले. वेदिका चौधरी व प्रणवी पाटील या विद्यार्थिनींना स्पर्धेत सहभागाचे प्रमाणपत्र प्राप्त झाले.
आपल्या शाळेतील विज्ञान शिक्षक अनिल पाटील यांचा जिजाऊ जन्मोत्सव समितीतर्फे कृतिशील शिक्षक म्हणून सन्मान करण्यात आला.
अनिल पाटील व कोमल महाजन यांनी संपादन केलेल्या यशाबद्दल त्यांचे संस्थेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, संचालक मंडळ, मुख्याध्यापिका प्रमिला वाघ,उपमुख्याध्यापक नरेंद्र पाटील,पर्यवेक्षक आर एल पाटील, ए बी अहिरे व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनींनी अभिनंदन केले आहे.