पाचोरा कॉंग्रेस ने स्थापना दिनी राबविलेल्या अभिनव उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

पाचोरा कॉंग्रेस ने स्थापना दिनी राबविलेल्या अभिनव उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

पाचोरा (प्रतिनिधी) – कॉंग्रेस पक्षाच्या १३८ व्या स्थापना दिनाचे औचित्य साधून येथील कॉंग्रेस ने रक्तदानासाठी रक्तदात्यांचा रक्तगृप तपासणी करण्यात आली

 

कॉग्रेस स्थापना दिनानिमित्त गरजु रुग्णांना कायम रक्ताची निकड असते अशावेळी रक्तदात्यांचा शोध घेणे अवघड होते यासाठी पाचोरा तालुका कॉंग्रेस अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या संकल्पनेतून रक्तदान करणाऱ्या नवीन दात्यांची रक्तगृप तपासणी डॉ. वैभव सुर्यवंशी यांच्या लिलावती हॉस्पिटल मध्ये सुधन लॅब च्या सौजन्याने रक्तगृप तपासणी कॅम्प घेण्यात आला. यावेळी शहर अध्यक्ष अॅड अमजद पठाण, आरोग्य सेवा सेल अध्यक्ष डॉ फिरोज शेख, अल्ताफ शेख, समाधान ठाकरे, रवी सुरवाडे, तौफिक शेख, अरबाज शेख,सुनिता पाटील, शुभांगी ढाकरे, अनिता पाटील, आदी उपस्थित होते. यावेळी रक्तगृप तपासणी करून रक्तदात्यांची यादी तयार करण्यात आली शहर व ग्रामीण भागातील रक्तदात्यांची उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून सर्व गृप चे रक्तदाते आढळून आले.