साहित्य संस्कृती व लेखनआस्वाद लेखाजोखा मांडणारा समीक्षा ग्रंथ:अक्षरायण

■ साहित्य संस्कृती व लेखनआस्वाद लेखाजोखा मांडणारा समीक्षा ग्रंथ:अक्षरायण ■

●-डॉ.भाऊसाहेब मिस्तरी
मो. ९९६०२९४००१

समीक्षक हा मुळात जातिवंत वाचक व रसिक असतो. तो
एक वास्तवादी भाष्यकार व उत्तम आस्वादक असतो. साहित्याचा नुसता आस्वाद घेणे ही एक वेगळी बाजू आहे. पण तो साहित्यातील सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक व कृषी मूल्य यावर समर्पक मिंमासा करतो.
समीक्षकाला विविध साधक बाधक संदर्भ, सुचक मतितार्थ व कालखंडातील साहित्यकांशी संवाद साधावा लागतो.
त्यांच्या साहित्यातून सामाजिक उन्नतीसाठी व देशहितासाठी आलेले विषय व आशयांची पार्शभूमी मांडावी लागते.
साहित्य अस्वाधातून साहित्य उन्नयन प्रक्रियेत मोलाचे योगदान देण्यासाठी वेळप्रसंगी वास्तव कटाक्ष करावे लागतात.
साहित्य कृतीच्या माध्यमातून समाजप्रबोधन हे लेखनाच्या केंद्रस्थानी असते.
साहित्य कलाकृतीशी वाचक जेव्हा समरस होतो तेव्हा तो वेगवेगळ्या पात्रात एकरुप होत असतो. तो त्या साहित्यकृतीतून स्वत्वाचा शोध घेत कसतो. अनेक वेळा त्यातून बोध घेतो. भविष्य घडविण्यासाठी प्रेरणा स्त्रोत म्हणून त्या कलाकृतीशी तादात्म्य पावतो. तेथून त्याच्या जीवनात उन्नयन होत जाते. एखादा साहित्यिक कलाकृती समाजापुढे ठेवतो. म्हणजे जीवनातील संपूर्ण अनुभव , वाईट , गोड आठवणी, प्रेरक प्रसंग, अपमान, मान, प्रोढी, खस्ता, माणूसकी, कृतघ्न्यता व कृतज्ञता या संपूर्ण गोष्टी कथा, कविता व कादंबरी यात मांडत असतो. ते एका प्रकारे जीवनाचे सारच असते. तो दस्तावेज वाचकाला जीवन कला शिकवून जातो.
या अनुषंगाने वेगवेगळ्या साहित्य कृतीवरील व्यंकटेश सोळंके यांचे भाष्य सर्वंकश व समर्पक मागोवा घेणारे आहे. त्यांचे पहिले पुस्तक हे समीक्षा ग्रंथाच्या माध्यमातून प्रकाशित झाले. हा योग त्यांच्यातील व्यासंगाची साक्ष देतो.
या समीक्षा ग्रंथात एकूण एकोणाविस साहित्य कलाकृतीवर भाष्य आहे. त्यात मातीखालचे पाय, पाच आऱ्याचे चाक , नदीष्ट, गावकळा , पांढरकवड्या, भरतायन, बाल कादंबरी गोंदू या अनुक्रमे बांबू बिरादार, देविदास फुलारी, मनोज बोरगावकर , कै.प्रदीप धोंडीबा पाटील , भरत माने व प्र.श्री.जाधव यांच्या कादंबऱ्याचा समावेश आहे. यातील जवळपास सर्वच कादंबऱ्या विद्यापीठीय अभ्यासक्रमात सामाविष्ट आहेत.
तसेच सु.द. घाटे व लक्ष्मी पुरमशेटीवाड यांच्या कथासंग्रहाचा समावेश आहे. मुनादी,अधांतरीचे प्रश्न, मातीतल्या कविता, ऋतूगंध, काळोखाच्या कविता, पुन्हा फुटतो भादवा , माती शाबूत व सूर्यपंख
अनुक्रमे मांगीलाल राठोड, अर्चना डावखरे शिंदे, संतोष अळंजकर ,लक्ष्मण मलगीलवार , नामदेव कोळी, अंमृत तेलंग, विरभद्र मिरेवाड व उद्धव सोनकांबळे यांच्या कवितांचा समावेश आहे.
तसेच थोर बालसाहित्यिक डॉ. सुरेश सावंत, एकनाथ ढुमने यांच्या अनुक्रमे युद्ध नको बुद्ध हवा व थेंबफुले बालकवीता संग्रावर भाष्य आहे.
या समीक्षा ग्रंथात संपूर्ण साहित्य प्रकारावर भाष्य केलेले आहे. यात असा निश्चित साहित्याचा कोणताही एक प्रकार नाही. यातून व्यंकटेश सोळंके यांचा व्यासंग व अष्टपैलू व्यक्तिमत्त्व दिसून येते. सहसा साहित्यात साहित्यिक कविता संग्राह साहित्य लेखनातून साहित्य प्रवेश करतो. पण त्यांचं पहिलं पुस्तक हे समीक्षेचं आहे. यातून त्यांची अभ्यासू साहित्य साधना ही व्याख्याणण्याजोगी आहे. मुळात ते गणित विषयाचे पदव्युत्तर असून साहित्य क्षेत्रात मराठी भाषेचा आभ्यास व समीक्षा लेखन हे एक वेगळी प्रतिभा संप्पनंतेच एक उदाहरण म्हणने वावगे ठरणारे नाही.
शुद्ध व प्रमाणित भावनेने वेगळे परिमाणे बाजूला ठेवून चांगल्या कलाकृतीस ते न्याय देतात. तेथे भेदभाव यास मुळीच धारा नसतो फक्त कलाकृती महत्वाची असते. प्रतिभा व कलाकृतीचे ते पुजक आहेत. त्यामुळे चांगल्या कलाकृतीची कदर त्यांच्याकडून नेहमी होते. हे त्यांचे मुख्य गुणवैशिष्ट्ये आहे.
वाङ्मयीन संस्कृतीत आस्वाद ,भाषा, ललित, कविता ,कथा , कादंबरी व समीक्षा असे प्रकार आहेत. आज मराठी भाषेच्या अस्तित्त्वाचे प्रश्न गंभीर बनत चालले आहेत . भाषेच्या संवर्धन हे जिकिरीचे काम बनले आहे.
मराठी लेखन , प्रकाशन , सांस्कृतीक मंडळे , साहित्य संमेलने व वाचनसंस्कृती यावर पुनर्विचार करने गरजेचे ठरले आहे. या अनुषंगाने व्यंकटेश सोळंके यांच्या वेगळ्या लेखन शैलीचे साहित्य क्षेत्रात मोलाचे व भरीव योगदान असेल यात दुमत नाही.
साहित्य व साहित्यिक संस्कृती जपायची असेल तर समीक्षा ही महत्त्वाची बाब आहे. साहित्य कृतितील मूल्यमापन व योग्य न्याय समिक्षेतून मिळतो. समीक्षेवर समीक्षा करणे हे काम खूप कठीण आहे. पण मनाला भावलेला समीक्षा ग्रंथ मला यात समाविष्ट असलेल्या एकोणाविस कलाकृतीचा विचार करायला भाग पाडतो . साहित्य संस्कृती व लेखनआस्वाद लेखाजोखा या ग्रंथातून अधोरेखित होतो. येत्या काळात त्या सर्व कलाकृती व त्यातील आस्वाद घेण्याची ऊर्मी मला या “अक्षरायण” या समीक्षा ग्रंथातून मिळालेली आहे. या समीक्षा ग्रंथास संतोष घोंगडे यांचं मुखपृष्ठ वेधक व साहित्यकृती अनुरुप आहे. पाठराखण रुपात दिलेला उतारा समर्पक आहे. निश्चितच या समीक्षा ग्रंथ सर्वांसाठी वाचणीय आहे.
यातून अनेक कलाकृती वाचन आस्वाद व त्यातील परामर्श यांचा उलगडा होतो. सर्वांनी व अभ्यासकांनी आवर्जून वाचावा असा हा समीक्षा ग्रंथ आहे.
व्यंकटेश सोळंके यांच्या भावी वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा..

समीक्षा ग्रंथ: अक्षरायण
लेखक: प्रा. व्यंकटेश सोळंके,नांदेड
(९९२२६५४७३२)
प्रकाश:- गणगोत प्रकाशन
पृष्ठे:-१२८
किंमत:-२७०/-