गो.पु.पाटील महाविद्यालय,कोळगाव येथील पहिलवान धीरज पाटील व कु.पायल सोनवणे यांची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

गो.पु.पाटील महाविद्यालय,कोळगाव येथील पहिलवान धीरज पाटील व कु.पायल सोनवणे यांची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड…!!!!

भडगाव (प्रतिनिधी) –
कर्मवीर तात्यासाहेब हरि रावजी पाटील,किसान शिक्षण संस्था,भडगाव,संचलीत,गोपीचंद पुना पाटील,कनिष्ठ महाविद्यालय,कोळगाव ता-भडगाव येथील विद्यार्थी व किसान स्पोर्ट्स अकॕडमीचे पहिलवान धीरज शरद पाटील (५७ किलो) व पायल कैलास सोनवणे (५० किलो) यांनी क्रीडा व युवक सेवा संचलनालय,पुणे तथा जिल्हा क्रीडा अधिकारी,कार्यालय,नाशिक आयोजित तथा उपमहाराष्ट्र केसरी पैलवान राजु लोणारी प्रायोजित लोणारी,क्रीडा संकुल,येवला जि.नाशिक येथे पार पडलेल्या नाशिक विभागीय फ्रीस्टाईल कुस्ती स्पर्धेत १९ वर्षाआतील गटात प्रथमस्थान प्राप्त केले असून दोघांची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे,दोघींना महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर,मंत्री छगन भुजबळ,उपमहाराष्ट्र केसरी राजु लोणारी,नाशिक विभागीय क्रीडा संचालक सुनंदा पाटील,क्रीडा अधिकारी जगदीश चौधरी,महेश पाटील आदिंच्या उपस्थितीत सुवर्णपदक देऊन गौरविण्यात आले.
धीरज व पायल यांना कैलास सोनवणे,शरद पाटील,अनिल बिऱ्हाडे,वाल्मिक पाटील,संजय कराळे,सयाजी मदने,कल्पेश कराळे,प्रल्हाद चौधरी,श्रीराम चौधरी,महेंद्र केदार,साहिल संकपाळ,जयदीप सोनवणे,तालुका समन्वयक सचिन भोसले,रविंद्र महाजन,बी.डी.साळुंखे,प्रा.रघुनाथ पाटील,राष्ट्रीय खो-खो पंच प्रा.प्रेमचंद चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले.
धीरज व पायलच्या या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन प्रतापराव पाटील,सचिव डॉ.पुनमताई पाटील,मंत्रालयीन उपसचिव प्रशांतराव पाटील,विद्यालयाचे प्राचार्य सुनिल पाटील,पर्यवेक्षक अनिल पवार,यांनी तसेच विद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर बंधु-भगिनी यांनी आनंद व्यक्त करीत त्याचे अभिनंदन करुन राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.