स्व.राजेंद्रजी श्रीवास्तव इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्याची राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड 

स्व.राजेंद्रजी श्रीवास्तव इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्याची राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड

 

पारध (श्री महेंद्र बेराड, भोकरदन तालुका प्रतिनिधी):

दिनांक 10 ऑक्टोबर रोजी हिंगोली येथे पार पडलेल्या विभागीय 14 वर्षाखालील बुद्धिबळ स्पर्धेत स्व. राजेंद्रजी श्रीवास्तव इंग्लिश स्कूल कनिष्ठ वरिष्ठ महाविद्यालय या शाळेतील विद्यार्थी शिवम ताम्हणे याने उल्लेखनीय यश संपादन केले असून त्याची राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

 

ग्रामीण भागातील विद्यार्थ्याने राज्यस्तरीय स्पर्धेत प्रवेश मिळवणे ही अत्यंत अभिमानाची व कौतुकास्पद बाब मानली जात आहे. “ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन व संधी मिळाल्यास तेही मोठ्या पातळीवर चमक दाखवू शकतात,” हे शिवमने आपल्या कामगिरीतून सिद्ध करून दाखवले आहे.

 

या यशामागे शाळेचे क्रीडाशिक्षक संतोष सोनुने सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. शिवमच्या कामगिरीबद्दल शाळेचे संस्थाचालक मनीष भैया श्रीवास्तव, उपसरपंच शेखर भैय्या श्रीवास्तव, विक्रांत भैय्या श्रीवास्तव, मुख्याध्यापक लक्कस सर, पत्रकार तथा लोकसंघर्ष पक्षाचे तालुकाध्यक्ष महेंद्र बेराड सर यांनी विशेष अभिनंदन करून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

 

तसेच शिक्षक गालफाडे सर, पाखरे सर, लोखंडे सर, लोखंडे मॅडम, भारती मॅडम, राधिका राऊत मॅडम, झोरे मॅडम व सोनुने सर यांनीही शिवमचे कौतुक करून त्याला पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

 

“शिवमसारखे विद्यार्थी हे ग्रामीण भागातील इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहेत,” असे शाळा प्रशासनाने सांगितले.