संत ज्ञानेश्वर महाविद्यालयात ‘वंदे मातरम’ सार्थशताब्दी महोत्सव उत्साहात साजरा

संत ज्ञानेश्वर महाविद्यालयात ‘वंदे मातरम’ सार्थशताब्दी महोत्सव उत्साहात साजरा

 

राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या पुढाकाराने विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची प्रेरणा

 

सोयगाव (प्रतिनिधी) : येथील अजिंठा शिक्षण संस्थेच्या संत ज्ञानेश्वर महाविद्यालयात ‘वंदे मातरम’ सार्थशताब्दी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात देशभक्तीचा उत्साह ओसंडून वाहत होता.

 

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिरीष पवार यांनी भूषवले. प्रमुख उपस्थिती म्हणून महाविद्यालयाचे पदव्युत्तर समन्वयक डॉ. शत्रुघ्न भोरे, तर प्रमुख वक्ते म्हणून डॉ. श्रीकृष्ण परिहार उपस्थित होते.

 

यावेळी वंदे मातरम गीताच्या इतिहास व अर्थावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख वक्ते डॉ. श्रीकृष्ण परिहार यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना ‘वंदे मातरम’ गीताचा ऐतिहासिक व सांस्कृतिक संदर्भ समजावून सांगत सखोल मार्गदर्शन केले. त्यांच्या प्रभावी व्याख्यानानंतर उपस्थित सर्वांनी एकत्रितपणे ‘वंदे मातरम’ गीताचे सामूहिक गायन केले.

 

कार्यक्रमाला कनिष्ठ विभाग प्रमुख डॉ. उल्हास पाटील, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. पंकज गावीत, डॉ. सुनील चौधरे, तसेच महाविद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. निलेश गावडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. सुनील चौधरे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, डॉ. निलेश गावडे, डॉ. पंकज गावीत, डॉ. सुनील चौधरे व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.