श्री. गो.से. हायस्कूल येथे दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न
. पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री. गो.से. हायस्कूल येथे फेब्रुवारी मार्च 2025 मध्ये झालेल्या इयत्ता दहावीच्या प्रथम एक ते दहा क्रमांकाच्या विद्यार्थ्यांचा स्वागत व सत्कार समारंभ मंगळवार दिनांक 27 मे रोजी आयोजित करण्यात आला होता.
…. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री. एन.आर. ठाकरे सर हे होते. उप मुख्याध्यापक श्री.आर.एल. पाटील सर,पर्यवेक्षक श्री. आर. बी. तडवी सर, ज्येष्ठ शिक्षक श्री. आर. बी. बांठीया सर, तांत्रिक विभागाचे प्रमुख श्री.एस.एन. पाटील सर, श्री. आकाश वाघ,कार्यालयीन प्रमुख श्री. अजय सिनकर, इयत्ता दहावीचे सर्व वर्गशिक्षक सर्व गुणवंत विद्यार्थी व त्यांचे पालक, इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी उपस्थित होते.
.. वरील सर्व मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा स्वागत व सत्कार करण्यात आला तसेच त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.एम. आर. पाटील सर व आभार प्रदर्शन श्री आर.एन. सपकाळे सर यांनी केले.