पंचायत समिती आयोजित क्रीडा स्पर्धा यशस्वीत संपन्न
जळगाव जिल्हा परिषद मार्फत जिल्ह्यात सर्व पंचायत समिती मार्फत तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली. पाचोरा पंचायत समितीचे तालुका स्तरीय हिवाळी मैदानी क्रीडा स्पर्धेचे आयोजन गट विकास अधिकारी अतुल पाटील,गट शिक्षण अधिकारी नरेंद्र चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा येथे एम एम कॉलेजच्या मैदानावर दोन दिवसीय स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेचे उद्घाटन गट विकास अधिकारी अतुल पाटील यांच्या हस्ते झाले. दोन दिवसीय चाललेल्या क्रिकेट, कबड्डी बुद्धिबळ, बॅडमिंटन, हॉलीबॉल स्पर्धेसाठी शिक्षण विभाग, ग्रामसेवक विभाग, ग्रामीण रुग्णालय विभाग, बी आर सी विभाग, यांनी सहभाग घेतला होता. यात शिक्षण विभागाने मैदानी खेळात आपला वर्चस्व दाखवला तर बुद्धिबळ व बॅडमिंटन यात गटविकास अधिकारी अतुल पाटील यांनी आपले वर्चस्व दाखविले. मैदानी क्रीडा स्पर्धामध्ये, कबड्डी स्पर्धेत पाचोरा टीचर्स टीम( प्रथम ) उर्दू टीचर्स असोसिएशन ( द्वितीय),हॉलीबॉल स्पर्धेत पाचोरा टीचर्स टीम( प्रथम) उर्दू टीचर्स असोसिएशन ( द्वितीय),क्रिकेट स्पर्धेत पाचोरा टीचर्स टीम (प्रथम) ग्रामसेवक संघटना (द्वितीय) आली. उर्दू शिक्षकांची कमी असल्याने एका शिक्षकाला सर्व फॉरमॅटमध्ये खेळायला लागला तरीही त्यांनी दोन फायनल मध्ये आपले स्थान बनवल्याने व जिंकण्याचे साहस्य व स्पोर्ट्स स्पिरिट दाखवल्याने गटशिक्षणाधिकारी नरेंद्र चौधरी यांच्या मार्फत त्यांचे कौतुक करण्यात आले. स्पर्धा यशस्वी बनवण्यासाठी संजय देवकर सहाय्यक गटविकास अधिकारी एम एस भालेराव, एसपी बागुल ,अमोल पाटील, विस्तार अधिकारी दिलीप सुरवाडे,राजकुमार धस,सुनील पाटील, विजय सावडे यांनी सहकार्य केले.