पाचोरा महाविद्यालयात डॉ. सीमा सैंदाणे यांच्या ‘शेतकरी आत्महत्या : एक चिंतन’ या पुस्तकाचे प्रकाशन

पाचोरा महाविद्यालयात डॉ. सीमा सैंदाणे यांच्या ‘शेतकरी आत्महत्या : एक चिंतन’ या पुस्तकाचे प्रकाशन

पाचोरा (प्रतिनिधी)
पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित, श्री.शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात तासिका तत्त्वावर कार्यरत राज्यशास्त्र विभागाच्या प्रा.डॉ. सीमा भास्कर सैंदाणे यांनी लिहिलेल्या ‘शेतकरी आत्महत्या : एक चिंतन’ या पुस्तकाचे प्रकाशन अहमदनगर येथील प्रसिद्ध साहित्यिक व व्याख्याते मा.डॉ.संजय कळमकर, पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार व संस्थेचे अध्यक्ष दिलीप वाघ, चेअरमन संजय वाघ यांच्या शुभहस्ते प्रकाशित करण्यात आले. याप्रसंगी व्हा.चेअरमन व्ही. टी. जोशी, पाचोरा पोलीस स्टेशनचे API धरमसिंह सुंदरडे कनिष्ठ महाविद्यालय व्यवस्थापन समितीचे चेअरमन प्रा. सुभाष तोतला, गो. से.हायस्कूलचे चेअरमन खलील देशमुख, ज्येष्ठ संचालक दगाजी वाघ, सतीश चौधरी, योगेश पाटील, संस्था पदाधिकारी, प्राचार्य मा. डॉ.शिरीष पाटील, उपप्राचार्य मा.डॉ.वासुदेव वले, उपप्राचार्य मा. डॉ.जे.व्ही. पाटील, उपप्राचार्य मा. प्रा. जी. बी. पाटील,पर्यवेक्षक मा. प्रा. एस. एस. पाटील, पर्यवेक्षक मा. प्रा. राजेश मांडोळे, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होत्या. सदर कार्यक्रमाप्रसंगी मान्यवरांनी डॉ. सीमा भास्कर सैंदाणे यांना पुस्तक प्रकाशनासाठी शुभेच्छा दिल्या.