नितीन सोनजे यांना आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार प्रदान

_नितीन सोनजे यांना आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार प्रदान….!!!!_

 

भडगाव (प्रतिनिधी) – पाचोरा तालुका शिक्षण संस्था,संचलीत,सौ.सुमनताई माध्यमिक विद्यालय,भडगाव येथील क्रीडा शिक्षक नितीन काशिनाथ सोनजे यांना जळगाव जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघातर्फे आदर्श क्रीडा शिक्षक या पुरस्काराने शारिरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालय,जळगाव येथील सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडलेल्या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले,त्यांना शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ,क्रीडा प्रकारातील नियम पुस्तिका तसेच त्यांच्या कार्याचा गौरव करणारे सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

सत्कारावेळी त्यांच्यासह त्यांच्या धर्मपत्नी सौ.अर्चना सोनजे,सौ.सु.गि.पाटील,विद्यालयाचे प्रा.शरद पाटील,प्रा.महेंद्र महाजन,प्रा.अमीत महाजन,प्रा.संदीप चौधरी,प्रा.हेमंत भदाणे,प्रा.डॉ.सचिन भोसले,गो.पु.पाटील,कनिष्ठ महाविद्यालय,कोळगाव (भडगाव) येथील.राष्ट्रीय खो-खो पंच प्रा.प्रेमचंद चौधरी आदि उपस्थित होते.

आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कारप्राप्त नितीन सोनजे यांच्या पुरस्कार प्राप्तीबद्दल भडगाव-पाचोरा मतदारसंघाचे मा.आ.दिलीपभाऊ वाघ,संस्थेचे चेअरमन नानासाहेब संजय वाघ,प्राचार्य विश्वासराव साळुंखे आदिंनी तसेच विद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी बंधु-भगिनींनी अभिनंदन करुन भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.