श्री.सु.भा. पाटील प्राथमिक विद्यामंदिर पाचोरा येथे आज इयत्ता-4 थी च्या विद्यार्थ्यांचा “निरोप समारंभ” संपन्न
पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री.सु.भा. पाटील प्राथमिक विद्यामंदिर पाचोरा येथे आज इयत्ता-4 थी च्या विद्यार्थ्यांचा “निरोप समारंभ” आयोजित करण्यात आला होता. मुख्य इमारतीत अध्यक्ष म्हणून श्री. गो.से.हायस्कूलचे पर्यवेक्षक श्री.ए. बी.अहीरे सर व भडगाव रोड विभागात पर्यवेक्षिका श्रीमती. अंजली गोहिल मॅडम होत्या. तर प्रमुख उपस्थिती श्री.महेश कौंडिण्य सर,श्रीमती.संगीता पाटील मॅडम,श्री.आर.बी.बोरसे सर व शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती. उज्वला साळुंखे मॅडम यांची होती. प्रतिमा पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेविषयी व शिक्षकांविषयी हृदयस्पर्शी मनोगते व्यक्त करत आपले अनुभव कथन केले.आपल्या शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करत त्यांना भेटवस्तू दिल्यात.श्री.महेश कौंडिण्य सर, श्री.आर.बी.बोरसे सर, श्रीमती.सारिका पाटील मॅडम,श्रीमती.सीमा भदाणे मॅडम,श्री.दीपक पाटील सर,श्रीमती. चारुशीला पाटील मॅडम यांनी देखील आपली मनोगते व्यक्त करत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.तसेच म. अध्यक्षांनी विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी आपल्या मनोगतातून शुभेच्छा व्यक्त केल्यात.सूत्रसंचलन श्री.मनोज पवार सर व श्रीमती. रूपाली निकम मॅडम यांनी तर आभार प्रदर्शन श्रीमती.जयश्री पाटील मॅडम व श्री.दीपक पाटील सर यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.