कला व विज्ञान महाविद्यालय,कोळगाव येथे एड्सविषयी जनजागृती

कला व विज्ञान महाविद्यालय,कोळगाव येथे एड्सविषयी जनजागृती….!!!!!

कोळगाव (भडगाव) – जागतिक एड्स दिन व पंधरवडा च्या औचित्याने ग्रामीण रुग्णालय भडगाव च्या आय सी टी सी विभाग ,साने गुरुजी फौंडेशन   कला  विज्ञान महाविद्यालय कोळगाव  यांच्या सयुक्त विद्यमाने महाविदयालयत  एच आय व्ही एड्स विषयी जनजागृती  कार्यक्रम आयोजित करण्यात आला

1 डिसेंबर जागतिक एड्स दिन व सप्ताह निमित्त संपूर्ण भारतभर् राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम भारत सरकार च्या व राज्य सरकार आरोग्य विभाग च्या मार्गदर्शना खाली  एच आय व्ही एड्स जनजागृती पर कार्यक्रमांचे आयोजन  करण्यात येते.त्या अनुषंघाने जिल्हा एड्स नियंत्रण पथक जिल्हा   सामान्य रुग्णालय जळगांव च्या मार्गदर्नाखाली  कला व विज्ञान महाविद्यालय कोळगाव ता.भडगाव  येथे ग्रामीण रुग्णालय भडगाव च्या आय सी टी सी विभागामार्फत जनजागृती पर माहिती व्याख्यान व एड्स कार्यक्रमचे बोध चिन्ह्  मानवी साखळी ने बनवने,पोष्टर प्रदर्शन,व चाचणी कार्यक्रम घेण्यात आला.

ग्रामीण रुग्णालयाचे आय सी टी सी समुपदेशक नामदेव पाटील यांनी उपस्थित विदयार्थी व शिक्षक,कर्मचारी यांना एच आय व्ही एड्स चे संसर्ग ,तपासणी,निदान,उपचार,व प्रतिबंधात्मक उपाय तसेच राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमचे  कार्य,स्वरूप,व एड्स च्या नियंत्रणात जनजागृतीचे महत्व व त्यात युवक व शिक्षकांची भूमिका महत्वाची आहे हे सांगितले. लिंक वर्कर सलीम पटेल यांनी एच आय व्ही चाचणी करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य श्री सुनील पाटील सर अध्यक्ष स्थानी होते.सूत्र संचालन श्री प्रशांत पाटील यांनी केले व महाविद्यालयचे प्रभारी प्राचार्य श्री संदीप बाविस्कर, पर्यवेक्षक अनिल पवार, कार्यवाहक श्री आर. ए. पाटील श्री आर.एस.कुंभार,श्री एस. ए. वाघ सर व सर्व शिक्षक , प्राध्यापक वृंद ,कर्मचारी   हजर होते.