शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे शाळेतील मोबाईल बंद करा : लोळेगाव येथील काल्याच्या किर्तनात ह.भ.प. राम महाराज झिंजुर्के यांचे जनतेला आवाहन 

शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे शाळेतील मोबाईल बंद करा : लोळेगाव येथील काल्याच्या किर्तनात ह.भ.प. राम महाराज झिंजुर्के यांचे जनतेला आवाहन

 

(सुनिल नजन “चिफब्युरो”स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) महाराष्ट्रातील सर्व शाळांतील शिक्षकांचे आणि विद्यार्थ्यांचे मोबाईल प्रथम बंद करा असे आवाहन शेवगाव तालुक्यातील आखेगाव येथील जोग महाराज संस्थानचे प्रमुख ह.भ.प. राम महाराज झिंजुर्के यांनी लोळेगाव येथे झालेल्या काल्याच्या किर्तना प्रसंगी केले.आजची तरुण पिढी ही भौतिक सुखाच्या मागे धावून बरबादी कडे वाटचाल करीत आहे.सरकारी शाळेतून चांगली हुशार आणि विचारवंत पीढी निर्माण करण्यासाठी प्रथम शाळेतील शिक्षकांचे आणि विद्यार्थ्यांचे मोबाईल बंद करण्यासाठी प्रत्येक गावातील ग्रामपंचायतीने हा ठराव मंजूर करून शिक्षण विभागाकडे पाठविला पाहिजे आणि एक नवीन आदर्श समाज निर्माण केला पाहिजे. आज घरातील प्रत्येक माणसाकडे मोबाईल आला आहे.काही मुर्ख माणसे, आणि शालेय विद्यार्थी हे मोटारसायकल चालवत असताना ही मोबाईल पहात गाडी चालवत आहेत हे तात्काळ म्रुत्युला आमंत्रण देत आहेत.विद्यार्थी रात्री झोपताना कपड्यांच्या आतुन मोबाईल पहात रात्री जागून काढीत आहेत.मोबाईल मुळे आजची तरुण पिढी ही बरबाद होत चालली आहे.मोबाईल मिळाला नाही तर अनेकांना सायको आजार होऊ लागले आहेत हे आपण पेपर मधुन पहात आहोत.छोट्या पासून तर मोठ्या पर्यंत सर्व जण आज या मोबाईलच्या चक्रव्यूहात अडकले आहेत त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीने शाळेत मोबाईल बंदचे ठराव घेऊन हे मोबाईल चे वारे बंद केले गेले पाहिजेत असे महाराजांनी आपल्या ठुमाकदार शैलीतून सांगितले. शेवगाव तालुक्यातील लोळेगाव येथे दि.२०ते२७ एप्रिल या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताहात गाथा पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कालावधीत सर्व ह.भ.प. राजाराम काटे, स्वामी प्रकाशानंदजी महाराज, लक्ष्मण महाराज भवार,ज्ञानेश्वर माउली बटुळे,प्रविण महाराज,उद्धव महाराज सबलस,इंदोरीकर महाराज यांची किर्तने झाली.इंदुरीकर यांनी औरंगाबादला जाता जाता सायंकाळी पाच ते सव्वा सहा या वेळेत फक्त सवा तासच किर्तन केले आणि काढता पाय घेतला. या मुळे अनेक भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली.इंदुरीकर महाराजातर्फे सायंकाळी पाच ते सात अशी किर्तनासाठी वेळ देण्यात आली होती.देवगडचे स्वामी प्रकाशानंदजी महाराज यांची गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली होती.अनेक माता भगिनींनी लोळे गावातील प्रत्येक चौकात सडासमार्जन करून जोरदार स्वागत केले होते.आणि दिंडी मिरवणूकीत सहभाग घेतला होता. ह.भ.प. झिंजुर्के महाराज पुढे म्हणाले की मेल्यावर मोक्ष मिळतो की नाही हा वादाचा मुद्दा आहे.परंतू हरीपाठ हा वारकरी संप्रदायाचा आत्मा आणि मोक्ष आहे.जगातील साऱ्या ग्रंथाच सारं हरीपाठ आहे.सप्ताह काळात मंदिरात कोणतीही सेवा केल्या शिवाय आपण महाप्रसादाचे दावेदार होउ शकत नाही.देवाचे गुणगान गाणारे हेच काल्याच्या महाप्रसादाचे खरे उत्तराधिकारी आहेत.परमार्थाचा रंग कधीच बदलत नाही.ज्ञानोबा तुकोबांची विचारधारा जपताना बारीक लक्ष ठेवले पाहिजे.प्रत्येक पालकांनी विद्यार्थ्यांचा कल पाहून त्यांना शिक्षण दिले पाहिजे.आपल्या मुलांचे मित्र मंडळ चांगले असले पाहिजे,चांगली संगत मिळाली पाहिजे.जिवनात ध्येय वादी बनन्यासाठी एक तरी मित्र मारवाडी, ब्राह्मण असला पाहिजे.नकारात्मक विचारांची संगत सोडा.सकारात्मक विचार जिवनात असल्यास फळ तात्काळ मिळतेच.जिवनात काम,क्रोधांना जो जिंकतो त्याचा खेळ यशस्वी होतो असे मत ह.भ.प.राम महाराज झिंजुर्के यांनी लोळेगाव येथे झालेल्या काल्याच्या किर्तनात व्यक्त केले. राजेंद्र केदार आणि बापुसाहेब केदार यांच्या काल्याच्या महाप्रसादाच्या पंगतीने या सोहळ्याची सांगता झाली.म्रुदुंगाचार्य म्हणून अविनाश लोखंडे,गायक ह.भ.प. भाउ महाराज फटांगरे, राधेश्याम महाराज आहेर,विणेकरी सुर्यभान महाराज डमाळे,यांनी चोख काम केले.या प्रसंगी आळंदीचे पंढरीचे वारकरी वै.काशिनाथ बाबा आणि वै.नारायण बाबा विधाटे यांच्यासह सर्व वैकुंठवासी झालेल्या महाराजांचे स्मरण करण्यात आले. एकसष्ट वर्षाची परंपरा या सप्ताहास लाभली आहे.या सोहळ्यासाठी गावातील आणि पंचक्रोशीतील अनेक भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सप्ताहात गावातील अनेक भाविक भक्तांनी सकाळ संध्याकाळ महाप्रसादाच्या पंगतीने अन्नदान केले.