श्री.गो.से.हायस्कूल येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात संपन्न

श्री.गो.से.हायस्कूल येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात संपन्न

पाचोरा ( प्रतिनिधी)
पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री. गो.से हायस्कूल, पाचोरा या विद्यालयात आज दि.2 ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी या दोन महान विभूतींच्या प्रतिमेस विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.पी.एम. वाघ , उप मुख्याध्यापक एन.आर. पाटील यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी विद्यालयाचे पर्यवेक्षक आर.एल.पाटील, तांत्रिक विभाग प्रमुख एस.एन. पाटील सांस्कृतिक विभाग प्रमुख आर. बी. तडवी, आर.बी.बोरसे, कार्यालयीन प्रमुख अजय सिनकर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी उपस्थित होते.
जयंती दिनाचे औचित्य साधून शालेय परिसर स्वच्छ करण्यात आला व तंबाखूमुक्ती ची शपथ घेण्यात आली.
याप्रसंगी विद्यार्थ्यांनी, तसेच बी.एस. पाटील सर,आर. बी तडवी यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या विषयी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन उज्वल पाटील व आभार प्रदर्शन मयूर देवरे सर यांनी केले.