एकमुखी दत्त श्रीपाद वल्लभ मंडळा तर्फे मढी ते गाणगापूर पायी दिंडी सोहळाचे प्रस्थान
(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) श्री क्षेत्र मढी ते गाणगापूर पायी दिंडी सोहळाचे प्रस्थान गुरूवार दिनांक २३ ऑक्टोबर रोजी सकाळी श्रीक्षेत्र मढी येथिल एकमुखी दत्त मंदिराचे अध्यक्ष गुरूवर्य पोपट महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली मढी येथुन सुरू करण्यात आले.कानिफनाथ देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त बबन तात्या मरकड, भाऊसाहेब मरकड नवनाथ मरकड यांच्या हस्ते दिंडी रथाची विधीवत महापुजा करण्यात आली.महाआरती नंतर डॉ जगन्नाथ मरकड कानिफनाथ गडावर वाजत गाजत मिरवणुकीने जाऊन दींडीतील पादुका डोक्यावर घेऊन त्या नाथांच्या चरणावर ठेवून मगच दींडी पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाली.४नोव्हेंबर पर्यंत हा पायी दिंडी सोहळा थेट गाणगापूर येथे मजल दर मजल करत जाणार आहे.रस्त्याने भजन, कीर्तन, प्रवचन,भारूड, गौळणी,अभंग, श्लोक,रिंगण सोहळा, सादरीकरण करण्यात येणार आहे.या दिंडी सोहळ्या साठी संदिप महाराज पवार,शिवाजी जाधव,नागेश पांचाळ, अभिजित शिंदे, गणेश गडगे, शिवाजी शिंदे हे आपले तन मन, धनाने योगदान देणार आहेत. या वर्षीचे हे दुसरे वर्ष आहे.तेरा दिवसात हा दिंडी सोहळा संपन्न होणार आहे.संपुर्ण महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील अनेक भाविक भक्त या दिंडी सोहळ्यात सहभागी झाले आहेत.
























