पाचोरा माळी समाज मंडळाच्या वतीने महात्मा जोतीराव फुले यांना स्मृती दिनानिमित्त अभिवादन

पाचोरा माळी समाज मंडळाच्या वतीने महात्मा जोतीराव फुले यांना स्मृती दिनानिमित्त अभिवादन

पाचोरा:राष्ट्रपिता क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव गोविंदराव फुले यांचा 28 नोव्हेंबर स्मृतीदिनानिमित्त ‌भडगाव रोड माळी समाज मंडळ पाचोरा यांच्या वतीने प्रथम अभिवादन कार्यक्रम आरोग्य सेवक विकास प्रल्हाद माळी यांच्या निवासस्थानी दत्त कॉलनी भडगाव रोड पाचोरा येथे पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी झेड.पी.चे माजी केंद्र प्रमुख शामराव देवराम महाजन सर हे होते. माल्यार्पण व प्रतिमा पुजनाचा कार्यक्रम माजी शिक्षक रावण हरचंद वानखेडे सर व शामराव देवराम महाजन सर यांच्या हस्ते संयुक्तपणे करण्यात आले. तसेच महात्मा फुलेंच्या जिवना वरती मनोगत सादर करताना प्रमुख पाहुणे सी.ए.समाधान प्रकाश माळी साहेब मुंबई, भाऊसाहेब प्रविण बी.महाजन अध्यक्ष क्रांतीसुर्य महात्मा फुले विचार मंच अंमळनेर,सुनिल जयराम महाजन सर,कृषी अधिकारी प्रदीप आसाराम माळी साहेब,एम.एम.कॉलेजचे संतोष नामदेव महाजन सर,विजय भास्कर महाजन, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हा संघटक शाहीर विठ्ठल एकनाथ महाजन (माऊली), यांनी शाहीरी च्या माध्यमातून महात्मा फुले च्या जिवनचरीत्राला उजाळा दिला.
तसेच अध्यक्षीय भाषण शामराव देवराम महाजन सर.इत्यादी वक्त्यांनी मनोगत सादर केले. कार्यक्रमाला उपस्थित माळी समाज बांधव राजेंद्र तुकाराम बोरसे,गुलाबराव शांताराम महाजन सर,अनिल भागवत महाजन,कालीदास भगवान पाटील,अनिल शिवाजी महाजन मोहाडी, रमेश तुळशीराम महाजन,अशोक नामदेव पाटील, आनंदा सावता महाजन,घनश्याम रामकृष्ण महाजन,विकास प्रल्हाद माळी,राहुल अरूण महाजन इत्यादी माळी समाज बांधव उपस्थित होते. सुत्रसंचलन गुलाबराव महाजन सर तर आभार विकास माळी साहेब यांनी मानले..