पाचोरा नगरपालिका मार्फत १ डिसेंबर पासून शारदीय व्याख्यानमाला 

पाचोरा नगरपालिका मार्फत १ डिसेंबर पासून शारदीय व्याख्यानमाला

पाचोरा प्रतिनिधी  पाचोरा येथे १ डिसेंबर पासून संध्याकाळी शारदीय व्याख्यानमाला सुरुवात पाचोरा येथील नगरपालिका तर्फे दरवर्षी व्याख्यानमाला आयोजित केली जाते ही व्याख्यानमाला पाचोरा नगरपरिषद पाचोरा जिल्हा जळगाव संचलित महात्मा गांधी वाचताना आयोजित यांच्यातर्फे केली जाते १ डिसेंबर ते ६ डिसेंबर पर्यंत ह्या व्याख्यानमालाचे आयोजन केले आहे या व्याख्यानमालेत महाराष्ट्रातून अनेक नामवंत कलावंत विविध विषयावर अभ्यास असलेले कलावंत वक्ते अभ्यासवंत व बुद्धिवादी ज्ञानी लोकांना बोलवण्यात येते यामध्ये अनेक विषय असतात श्री.छत्रपती शिवाजी महाराज श्री. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्री. महात्मा ज्योतिबा फुले झाशीच्या राणी भारतीय संविधान भारतीय इतिहास गझल गायन सम्राट हास्य नाट्य कलाकार विविध क्षेत्रातील मान्यवर या कार्यक्रमासाठी पाचोरा नगरपालिका आमंत्रित करीत असतात या कार्यक्रमासाठी पाचोरा नगरपालिका तर्फे मुख्याधिकारी सौ. शोभाताई बाविस्कर उपमुख्य अधिकारी श्री. दगडू शिवाजी मराठे प्रशासकीय अधिकारी श्री. प्रकाश आप्पा भोसले सहाय्यक ग्रंथपाल श्री. श्याम भाऊ ढवळे नगरपालिका लिपिक श्री. ललितभाऊ सोनार ग्रंथपाल शिपाई श्री. गजाननभाऊ पाटील व सर्व नगरपालिका अधिकारी व कर्मचारी यांच्या सहकार्यानुसार या व्याख्यानालाचे आयोजन केले आहे तरी सर्व नागरिकांनी व महिला वर्गांनी तसेच तरुण वर्गांनी व्याख्यानमालासाठी उपस्थित राहावे असे पाचोरा नगरपालिका मुख्याधिकारी सौ. शोभाताई बाविस्कर मॅडम व सहाय्यक ग्रंथपाल श्री. श्यामभाऊ ढवळे यांनी कळवले आहे.