पाचोऱ्यात साक्षात शिवयुगाच दर्शन घडवणारे “सुवर्णयुग माझ्या शिवबाचं” महानाट्याचे आयोजन… – श्री. गो. से. हायस्कूलचा स्तुत्य उपक्रम…

पाचोऱ्यात साक्षात शिवयुगाच दर्शन घडवणारे “सुवर्णयुग माझ्या शिवबाचं” महानाट्याचे आयोजन…
– श्री. गो. से. हायस्कूलचा स्तुत्य उपक्रम…

शहर प्रतिनिधी / पाचोरा
पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री. गो. से. हायस्कूलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त साक्षात शिवयुगाचं दर्शन घडवणारे “सुवर्णयुग माझ्या शिवबाचं” महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे.
पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन नानासाहेब संजय वाघ यांच्या मुळ संकल्पनेतुन छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवानिमित्त साक्षात शिवयुगाचं दर्शन घडवणारे “सुवर्णयुग माझ्या शिवबाचं” महानाट्याचे आयोजन २० फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता श्री‌. गो. से. हायस्कूल येथे करण्यात आले आहे. या महानाट्याचे लेखन आणि दिग्दर्शन हायस्कूलचे शिक्षक महेश कौंडिण्य यांनी केले आहे. सदरचे महानाट्य संस्थेचे अध्यक्ष तथा मा. आ. भाऊसो दिलीप वाघ, मानद सचिव अॅड. महेश देशमुख, व्हाईस चेअरमन विलास जोशी, शालेय समिती चेअरमन खलील देशमुख, तांत्रिक विभाग प्रमुख वासुदेव महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले आहे. या महानाट्यात हायस्कूलच्या तब्बल १५१ विद्यार्थ्यांचा सहभाग असणार आहे. या महानाट्याचा पंचक्रोशीतील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन मुख्याध्यापिका प्रमिला वाघ, उपमुख्याध्यापक नरेंद्र पाटील, पर्यवेक्षक आर. एल. पाटील, पर्यवेक्षिका अंजली गोहील, ए. बी. अहिरे यांनी केले आहे. महानाट्य यशस्वीतेसाठी हायस्कूलचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थीनी अथक परिश्रम घेत आहेत.