पुरुष व महिला गट राज्य ऑलम्पिक खो खो स्पर्धेची तयारी पूर्ण

पुरुष व महिला गट राज्य ऑलम्पिक खो खो स्पर्धेची तयारी पूर्ण
शहरवासीयांना खो-खोचा थरार पाहण्याची संधी
जळगाव:– महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र ऑलम्पिक असोसिएशन द्वारा आयोजित महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक खो खो क्रीडा स्पर्धा येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलात 10 ते 12 जानेवारी या कालावधीत संपन्न होत आहे. या स्पर्धेत महाराष्ट्र राज्यातील वरिष्ठ गट खो खो स्पर्धेतील अकरा महिलांचे संघ व 11 पुरुष गटाचे संघ सहभागी होणार असून या स्पर्धेची जय्यत तयारी येथील जिल्हा क्रीडा संकुलात करण्यात आलेली आहे. या स्पर्धा मॅटच्या मैदानांवर घेण्यात येणार आहेत. या स्पर्धेची तयारी जिल्हा क्रीडा अधिकारी श्री मिलिंद दीक्षित, राज्य सरचिटणीस श्री गोविंद शर्मा तालुका क्रीडा अधिकारी श्री गुरुदत्त चव्हाण, डॉ.प्रशांत इनामदार (सहसचिव महाराष्ट्र खोखो असोसिएशन श्री जयांशु पोळ (सहसचचिव महाराष्ट्र खो-खो असोसिएशन )यांच्या देखरेखीखाली करण्यात आलेली आहे. या स्पर्धेत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा खो खो खेळातील थराररक खेळ पाहण्याची संधी जळगाव शहरवासीयांना उपलब्ध होणार आहे. प्रेक्षकांना हया स्पर्धाेचा जवळून पाहण्याचा आनंद घेता यावा यासाठी भव्य प्रेक्षक गॅलरी उभारण्यात आलेली आहे. स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य खो-खो संघटनेचे 40 सदस्याचे तांत्रिक समिती सदस्यमंडळ व पंचमंडळ शहरात दाखल झालेले आहे. पुरुष व महिला गट राज्य स्पर्धेच्या यजमान पदाची प्रथमच जबाबदारी जळगाव शहरास मिळालेली आहे. स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी जळगाव जिल्हा खोखो संघटनेचे सचिव श्री राहुल पोळ, श्री अनिल माकडे, श्री दिलीप चौधरी, दत्तात्रय महाजन, सुशांत जाधव,प्रा.प्रेमचंद चौधरी,परिश्रम घेत आहेत.