श्री. सु.भा.पाटील प्राथमिक विद्यामंदिर येथे पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे आधारवड,लोकनेते,सहकार महर्षी,मा.आ. स्वर्गीय आप्पासाहेब ओंकार नारायण वाघ यांच्या पुण्यतिथी निमित्त विविध स्पर्धा

पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री. सु.भा.पाटील प्राथमिक विद्यामंदिर येथे आज पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे आधारवड,लोकनेते,सहकार महर्षी,मा.आमदार स्वर्गीय आप्पासाहेब ओंकार नारायण वाघ यांच्या पुण्यतिथी निमित्ताने “सुंदर हस्ताक्षर” व “रंगभरण” स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. प्रथमत: सकाळ सत्रात शाळेचे मुख्याध्यापक श्री. अशोक परदेशी सर,दुपार सत्रात ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती. लक्ष्माबाई सोनवणे मॅडम, भरो विभागात ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती. सारिका पाटील मॅडम व श्रीमती. जयश्री पाटील मॅडम यांच्या हस्ते आप्पासाहेबांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. तद्नंतर विद्यार्थ्यांच्या स्पर्धा घेण्यात आल्या. श्री. मनोज पवार सर,श्री.दीपक पाटील सर,श्री.आशिष पाटील सर यांनी आप्पासाहेबांच्या जीवन कार्याविषयी विद्यार्थ्यांना अवगत केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने परिश्रम घेतले.