बेटावद घटनेतील आरोपींना अटक करा पाचोरा कॉग्रेसची मागणी
पाचोरा (प्रतिनिधी) – भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस कडुन जामनेर तालुक्यातील बेटावद येथील घटनेचा निषेध करुन आरोपींना तात्काळ अटक करा या मागणीसाठी तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली प्रांताधिकारी सह पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले. सदर प्रकरणी सनदशीर आंदोलन चा इशारा दिला आहे.
जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील बेटावद येथे वीस ते पंचवीस लोकांच्या जमावाने सुलेमान खान नावाच्या युवकास बेदम मारहाण करून त्याची हत्या करण्यात आली या घटनेचा निषेध करून पाचोरा तालुका काँग्रेस ने तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात निवेदन देण्यात आले यावेळी उपविभागीय कार्यालयाचे निवासी नायब तहसीलदार रणजीत पाटील, पोलीस निरीक्षक राहुल पवार यांनी निवेदन स्वीकारले यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या निवेदनातुन आपल्या भावना शासनापर्यंत आम्ही पोहोचवतो असे अधिकाऱ्यांनी सांगितले निवेदन देताना सामाजिक कार्यकर्ते व काही राजकीय कार्यकर्ते देखील उपस्थित होते. यावेळी निवेदनावर शेख इस्माईल शेख फकीरा, अॅड अविनाश भालेराव, अॅड अमजद पठाण, इरफान मणियार, शरीफ शेख, शेख रसूल शेख उस्मान, अॅड वसीम बागवान, श्रावण गायकवाड, श्याम वाघ, सलमान खान, अशोक मोरे, अनिल सावंत, सैय्यद सलीम मणियार, मतीन बागवान, फारूक पिंजारी, अशोक मोरे, प्रवीण बागुल, खंडू सोनवणे, आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
























