गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल, पाचोरा येथे मातृ पितृ दिवस उत्साहात साजरा

गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल, पाचोरा येथे मातृ पितृ दिवस उत्साहात साजरा

पाचोरा येथे सालाबादा प्रमाणे गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल, पाचोरा येथे मातृ पितृ दिवस उत्साहात साजरा ,14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे या पाश्चात्य संस्कृतीचे अंधानुकरण करणाऱ्या युवा पिढीला संस्कारमय बनविण्यासाठी सालाबादाप्रमाणे *मातृ पितृ दिवस* साजरा करण्यात आला. इयत्ता 2री ते 9वीच्या विद्यार्थी पालकांसमोर योग वेदांत समितीच्या वतीने पालकांचे महत्व सांगण्यात आले.त्यानंतर उपस्थित पालकांचे पाल्यानी भारतीय संस्कृती प्रमाणे पूजा, आरती करून, पालकाभोवती प्रदिक्षणा घालून वातावरण भाव विभोर केले. लहान चिमुकल्याकडून अशा संस्कृतीमय सन्मानामुळे पालक अश्रूमय होऊन भारावून गेले व शाळेच्या या उपक्रमाचे अभिप्राय देताना माता पित्याला अग्र स्थान देणारा असा हा उपक्रम आहे , असे उदगार काढले.