महिलांना स्वतंत्र व्यासपीठ निर्माण व्हावे याकरिता संजीवनी महिला मंडळांनी ग्रुपची स्थापना केली त्या माध्यमातून महिलांना काम करण्याची संधी मिळाली

महिलांना स्वतंत्र व्यासपीठ निर्माण व्हावे याकरिता संजीवनी महिला मंडळांनी ग्रुपची स्थापना केली त्या माध्यमातून महिलांना काम करण्याची संधी मिळाली

( पाचोरा प्रतिनिधि अनिल आबा येवले )
पाचोरा येथील नुकतेच नवीन स्थापन झालेले संजीवनी महिला मंडळ या महिला मंडळांचा उद्दिष्ट सर्व स्तरातील महिलांना सांस्कृतिक तसेच औद्योगिक मंच उपलब्ध करून देणे हे आहे या मंडळाच्या माध्यमातून सर्व स्तरातील महिलांनासाठी वर्षभरामधून जे कार्यक्रम घेतले जातील त्या कार्यक्रमांमध्ये स्थान देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवला जाईल हे कार्यक्रम फक्त मनोरंजनासाठी नाही नसून त्या माध्यमातून सर्व महिलांनी एकत्रित येऊन आपल्या विचारांची देवाण-घेवाण करावी आणि त्याचबरोबर आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावावा ही मूळ संकल्पना आहे या कार्यक्रमांमध्ये बचत गटांच्या मार्फत व्यवसाय स्थापन केलेल्या महिलांनाही प्रोत्साहित केले जाईल. महिलांकरता अनेक उद्योग असून घरगुती उद्योग करून आपला उदरनिर्वाह भागवू शकतात तसेच महिला या कोणावरही अवलंबून न राहता आपल्या स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी शिक्षणात सुद्धा पुढे गेले पाहिजे महिलांकरता अनेक ठिकाणी 50 टक्के जागा राखीव असेल महिलांनी त्याकरिता जास्तीत जास्त प्रयत्न केले पाहिजे या उद्देशाने तसेच सामान्य घरातील महिलांना कुठेही वाव मिळत नाही तसेच काही प्रतिष्ठित महिलाही इच्छुक असतात पण त्यांना योग्य व्यासपीठ भेटत नाही त्यामुळे त्यासुद्धा वंचित राहतात अशावेळी महिलांना एकत्रित करण्यासाठी पाचोरा येथील संजीवनी महिला मंडळ हा मंच स्थापन करून त्या मार्फत या महिलांनी स्वामी लॉन्स येथे महिला करता परिवाराकरता योग्य माफक दरात काही वस्तू ठेवण्यात आल्या होत्या त्यामुळे सर्व स्तरातील महिलांना फायदा होईल असे उपक्रम राबवण्यात आला या महिलांमध्ये गरीब घरची व मोठ्या घरची असा कुठलाही भेदभाव न करता सर्वांना संधी द्या देण्यात आली या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी नगरसेविका सौ सिंधुताई पंडित शिंदे. आठवले मॅडम डॉक्टर शितल सावनेरकर मॅडम डॉक्टर प्रीती ताई मगर सौ सुनीताताई मराठे यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाचे नियोजन संजीवनी महिला मंडळाचे सौ ललिता ताई पाटील सौ संगीता ताई येवले सौ ज्योतीताई चौधरी व यांना पुजा ताई शिंदे यांची प्रमुख साथ मिळाली या सर्वांचा हा पहिलाच उपक्रम असून उत्साह पूर्ण करण्यात आला या कार्यक्रमाला असंख्य महिला उपस्थित होत्या या कार्यक्रमाचे महिला वर्गातून आनंद व्यक्त करण्यात येत आहे.