शेतकऱ्यांनी नुकसान झालेल्या फळपिकांची माहिती कळविण्याचे कृषि विभागाचे आवाहन

शेतकऱ्यांनी नुकसान झालेल्या फळपिकांची
माहिती कळविण्याचे कृषि विभागाचे आवाहन

जळगाव, दि. 31 जिल्ह्यात सन 2020-21 करीता पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना मृग व आंबिया बहार करीता अधिसुचित फळपिकांना लागु करण्यात आली आहे. या योजनेत आता अंबिया बहारा करीता मोसंबी, डाळींब, केळी व आंबा यापिकांसाठी अधिसुचित क्षेत्रात राबविण्यात येत आहे.
पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना (अंबिया बहार) आता केळी व आंबा यापिकांसाठी लागू आहे. तेव्हा नुकसानग्रस्त विमाधारक शेतकऱ्यांनी नुकसान झालेल्या फळपिकांची माहिती विमा कंपनी व कृषि विभागास (तालुकास्तरावर) त्वरीत कळविणे (Intimition) आवश्यक आहे.
जिल्ह्यात गेल्या दोन/तीन दिवसांपासून वेगाचा वारा/अवेळी पाऊसामुळे फळपिकांचे नुकसान झालेले आहे. अशा नुकसानग्रस्त विमाधारक शेतकऱ्यांनी संबंधीत विमा कंपनी, महसुल विभाग व कृषि विभागाच्या मदतीने वैयक्तीक पातळीवर नुकसानीचे पंचनामे त्वरीत करुन घ्यावेत. असे आवाहन संभाजी ठाकूर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.