लोहारा येथे खंडोबाच्या नावाने चैत्रंशुद्ध चतुर्दशीच्या दिवशी बारा गाड्या ओढण्याची परंपरा

लोहारा येथे दि.15 रोजी बारागाड्या ओढल्या जाणार.

लोहारा (प्रतिनिधी ) पाचोरा तालुक्यातील लोहारा येथे चैत्रशुद्ध चतुर्दशी शुक्रवार, 15.4.2022 रोजी जागृत खंडेरावाच्या नावाने बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. 15 एप्रिल रोजी सायंकाळी 4 वाजता सोनद नदी ते बाजारपेठ जवळ असणाऱ्या जागृत श्री खंडोबा महाराज मंदिरापर्यंत बारागाड्या | ओढल्या जाणार आहेत. तसेच त्या अगोदर
गावातून काठी मिरवणूक व खंडेराव भक्तांची सवाद्य मिरवणूक काढण्यातं येणार आहे. ही परंपरा गेल्या 47 वर्षांपासून अखंडितपणे चालू आहे. लोहारा येथील खंडेरावांचे परम भक्त कै. लोटू नारायण चौधरी यांनी 1975 या वर्षा पासून खंडोबाच्या नावाने चैत्रंशुद्ध चतुर्दशीच्या दिवशी बारा गाड्या ओढण्याची परंपरा सुरू केली होती. ती आजही अखंडितपणे चालू आहे. कै. लोटू नारायण चौधरी यांच्या निधनानंतर त्यांचे कनिष्ठ सुपुत्र कै. किशोर लोटू चौधरी यांनी जवळपास चार वर्षे बारा गाड्या ओढल्या,मात्र त्यांच्या अकस्मात निधनानंतर कै. लोटू नारायण चौधरी यांच्याच घराण्यातील मूळचे लोहारा येथील रहिवाशी व हल्ली औरंगाबाद येथे नोकरीनिमित्त वात्सव्यास असलेले पांडुरंग नथ्थु चौधरी यांचे सुपुत्र जितेंद्र चौधरी हे बारा गाड्या ओढणार आहे.
यावेळी बारागाड्या ओढण्यासाठी अनिल भगत, विकास भगत (शेंदुर्णी), पांडुरंग चौधरी, विजय चौधरी, दिगंबर नथ्थु चौधरी, सुनील चौधरी, महेश मिसाळ, डॉ. प्रिंतेश चौधरी, अशोक चौधरी, गोकुळ चौधरी, (बापू ).प्रताप चौधरी, भास्कर चौधरी, प्रकाश चौधरी, उत्तम चौधरी, पहुर येथील भगत मंडळी व समस्त पवार परिवाराचे सदस्य व ग्रामस्थांचे विशेष सहकार्य लाभणार आहे. भगत जितेश (जितेंद्र )चौधरी हे दुसऱ्यांदा बारागाड्या ओढणार आहेत. बारागाड्या ओढल्यानंतर रात्री महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.