क्रिएटिव्ह स्कूल ला वृक्ष दिंडी -ग्रंथदिंडी काढून आषाढी साजरी

क्रिएटिव्ह स्कूल ला वृक्ष दिंडी -ग्रंथदिंडी काढून आषाढी साजरी

नांद्रा ता. पाचोरा( वार्ताहर) येथील क्रिएटिव्ह स्कूल ला आषाढी एकादशीचे औचित्य साधून वारकरी संप्रदायातील पायी दिंडी जाण्याचे श्रेष्ठत्व व महत्त्व विद्यार्थ्यांना कळावे व महाराष्ट्रातील पंढरपूरला आषाढी व कार्तिकी एकादशीनिमित्त विठ्ठल रुक्माई साठी शेतकरी वर्ग व भाविक भक्त यांच्यात किती उत्साह असतो याच महत्त्व विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवता यावे या साठी वृक्षदिंडी,ग्रंथदिंडी व आषाढीची दिंडी असा नयनरम्य दिंडी सोहळा क्रिएटिव्ह स्कूलच्या प्रांगणात उत्साहात संपन्न झाला याप्रसंगी विठ्ठल -रुक्माई व वारकरी अशा विविध वेशभूषात दिंडी सोहळ्यात डोक्यावर कलश तुळशी घेऊन नऊवार व कुर्ता धोती पैजामा परिधान करून चिमुकल्या विद्यार्थ्यांनी टाळ मृदुंगाच्या गजरावर ठेका घेतला याप्रसंगी सुरुवातीला दिंडी पूजन महिला पालक प्रतिनिधी व प्रा. यशवंत पवार यांच्या शुभहस्ते करण्यात आले त्यानंतर पावसाच्या रिमझिम सरींबरोबर स्कूल पटांगणातच दिंडीच्या वारकरी विद्यार्थी टाळ घेऊन व विठ्ठल नामाचा जयघोष करून दिंडीत नाचू लागले याबरोबरच प्रा. यशवंत पवार यांनी ज्ञान पंढरीचे आम्ही वारकरी…..सभेचे पताके घेऊ खांद्यावरी.. हे दिंडी सोहळा निमित्त ज्ञान गीत गाऊन विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगणित केला.याप्रसंगी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षिका वृंद अरुंधती राजेंद्र,नम्रता पवार, वैशाली पाटील,श्वेता पाटील,श्वेता बोरसे,मोनिका बोरसे,इंगळे मॅडम, पूजा सूर्यवंशी, सुभाष पिंपळे ्यांनी परिश्रम घेतले.