नवीन शिक्षक शाळेत बदल घडणार, शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील
बदली होऊन शाळेत रुजू झालेले शिक्षक शाळेला नवीन दिशा देऊन बदल घडणार, शिक्षणाच्या माध्यमातून समाजाला जोडून विद्यार्थ्यांच्या, शाळेचा व गावाच्या विकास करणार असे प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख व माजी जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब पाटील यांनी जिल्हा परिषद उर्दू शाळा नगरदेवळा तालुका पाचोरा येथे आयोजित एका सत्कार समारंभ मध्ये केले. त्यांनी गुरुवार रोजी नवीन रुजू झालेले उपशिक्षक शेख जावेद रहीम व उपशिक्षिका नविदा बानो यांचे सत्कार करून पुढच्या वाटचालीस शुभेच्छा दिली.विद्यार्थ्यांचे शिक्षणासाठी, विकासासाठी जे काही मदतची आवश्यकता असेल मी सदैव मदतीचा हात देण्यास तयार आहोत असे आश्वासन त्यांनी दिले. मागच्या काही वर्षांपूर्वी 280 पटसंख्यावर फक्त तीन शिक्षक कार्यरत होते आता सात शिक्षक झाले असून शिक्षकांनी विद्यार्थ्यांवर खूप मेहनत करावी त्यांचे भविष्य घडावे, शाळा निपुण करावी अशी आशा त्यांनी व्यक्त केली.यावेळी शालय व्यवस्थापन समिती अध्यक्ष वसीम गुलाम अहमद,उपाध्यक्ष शेख अफरोज रहीम,माजी ग्रामपंचायत सदस्य अन्सार शेख अमीर, सदस्य वसीम पटवे ,उमर बेग मुसशताक खान,नासिर मन्यार, मकसूद शाह,सरदार एस के पवार हायस्कूल येथे कार्यरत शिक्षक जहांगीर शेख, अहतेशाम शेख, इकबाल शेख, खालील शेख, मुख्याध्यापक अजहर शेख ,रिजवान शेख, अन्सारी सना, शोएब अन्सारी, मकसूद शाह,नवीदा बानो इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी शिक्षक जावेद रहीम यांनी मान्यवरांचे आभार व्यक्त केले.

























