मुलींनी बांधले वडिलांचे स्मारक

मुलींनी बांधले वडिलांचे स्मारक

श्रीकृष्ण लान्सचे संस्थापक स्व.आण्णासो. एकनाथ चौधरी यांचा दिनांक ०९/०४/२०२१ रोजी मृत्यू झाल्यामुळे वडिलांची आठवण व कार्य सदैव स्मरणात राहावे तसेच वडिलांच्या कार्यातून इतरांनी सुद्धा प्रेरणा घ्यावी म्हणून स्व. आण्णासो एकनाथ चौधरी यांच्या तीन कन्या छायाश्री, जयश्री, राजश्री यांनी आपल्या वडिलांचे भव्य स्मारक श्रीकृष्ण लान्सच्या आवारात बांधले त्याचे अनावरण स्व. आण्णासो. एकनाथ चौधरी यांच्या पत्नी श्रीमती यमुना चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले आजच्या धावपळीच्या युगात कोणालाच कोणासाठी वेळ नसतांना सुद्धा त्यांच्या तिन्ही मुली छायाश्री, जयश्री, राजश्री यांचे वडिलांवर किती प्रेम होते याचा प्रत्यय पुन्हा एकदा सर्वाना आला आण्णा यांच्या तीन कन्यापैकी दोन कन्या अमेरिकेत स्थायिक आहेत परंतु वडिलांचे स्मारक उभारण्यासाठी त्या तीन महिन्यांपासून जळगावात आहेत ह्या स्मारकाचे अनावरण आण्णाच्या पत्नी श्रीमती यमुना चौधरी यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले ह्या स्मारकाचे वेगळेपण असे कि वडिलांनी निर्माण केलेल्या वास्तूत चौधरी परिवारा तर्फे धार्मिक विधी पूर्ण करून स्मारकाचे अनावरण केले गेले. सदर कार्यक्रमात श्रीकृष्ण लान्स मधील सर्व कर्मचारी वर्गाचा चौधरी परिवारातर्फे सत्कार करण्यात आला व ह्यापुढे आण्णाच्या कामाची व श्रीकृष्ण लान्सची जबाबदारी ही श्री आदेश ललवाणी यांच्यावर सोपवण्यात आली

कोण आहेत स्वर्गीय एकनाथ चौधरी साहेब

आण्णासो. एकनाथ चौधरी यांचा जन्म २१/०५/१९४० रोजी रोजी झाला ते आण्णा साहेब या नावाने समस्त जळगावकरांना परिचित होते वयाच्या सत्तरीत निवृत्ती नंतरच्या आयुष्यात त्यांनी श्रीकृष्ण लान्स सारखे भव्य दिव्य व समाजोपयोगी वास्तूची उभारणी करून प्रत्येक ग्राहकाला संतुष्ट करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले
अण्णांची आठवण कायम स्वरुपी राहण्यासाठी तिघी बहीणींनी व सर्व परिवाराने अण्णांचा पुर्णकृती स्मारक उभारून संपुर्ण समाजात एक वेगळे स्थान निर्माण केले हे खरोखर कौतुका जोगे आहे. समाजात आजच्या काळात वडीलांच्या संपत्तीत वाटा मिळावा म्हणून संघर्ष, वाद व हाणामाऱ्या होताना नेहमीच बघायला मिळतात परंतु त्या सर्वासमोर एक आदर्श उदाहरण तिघी बहीणींनी उभे केले सदर कार्यक्रमाचे नियोजन व प्रास्ताविक नितिन वायकोळे यांनी केले