पाचोऱ्यात पं.स.अंतर्गत “गितगायन” स्पर्धा संपन्न

पाचोऱ्यात पं.स.अंतर्गत “गितगायन” स्पर्धा संपन्न करण्यात आली


पाचोरा ( प्रतिनिधी )

आज दिनांक १२/१/२०२३ गुरुवारी पाचोरा पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद शिक्षकांची “गितगायन” स्पर्धा गट शिक्षण अधिकारी आदरणीय श्री गिरिषजी जगताप साहेबांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यात Rising Singing Stars Group चे सदस्य पुरुषांमधून श्री.राजेंद्र राठोड तर स्रीयां मधून श्रीमती.स्वाती महाजन मॅडम यांनी तालुक्यातून पहिला क्रमांक पटकविला.

परिक्षक म्हणून श्री.सागर थोरात व श्री.गोविंद मोकाशी सरांनी काम पाहीले. विजेतांचे ग.शि.अ. साहेबांनी अभिनंदन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शि.वि.अ.श्री. समाधान पाटील साहेब, श्रीमती सरोज गायकवाड मॅडम, अध्यक्ष श्री.राजेंद्र कोळी सर तसेच पंंचायत समिती कर्मचारी पाचोरा यांनी प्रयत्न केले.