चोपडा महाविद्यालयात ‘राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस’ उत्साहात साजरा

चोपडा महाविद्यालयात ‘राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस’ उत्साहात साजरा

चोपडा: येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश पाटील महाविद्यालयात दि. २४ सप्टेंबर २०२३ रोजी ‘राष्ट्रीय सेवा योजनेचा स्थापना दिवस’ साजरा करण्यात आला. याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. ए.एल. चौधरी हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. यावेळी एन.सी.सी. चे कॅप्टन डॉ. बी. एम. सपकाळ, विद्यार्थी विकास विभाग प्रमुख डॉ. डी. डी.कर्दपवार, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. पी.के. लभाने, राष्ट्रीय सेवा योजना महिला सहाय्यक कार्यक्रम अधिकारी सौ.एस. बी. पाटील तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. पी.के. लभाने यांनी केले. यावेळी त्यांनी कार्यक्रम घेण्यामागचा उद्देश तसेच भारत सरकारच्या विविध योजनांची माहिती विद्यार्थ्यांना दिली.
या कार्यक्रमाप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवक काजल सोनवणे, बिना पठाण, ऋतुजा महाजन, रोशनी शिंदे, जयश्री शिंदे यांनी विविध भित्तीपत्रकांच्या माध्यमातून राष्ट्रीय सेवा योजनेचा संदेश दिला तसेच वैभव शिरसाठ,गौरव बाविस्कर, गंगा करणकाळे, तनुश्री सनेर या स्वयंसेवकांनी ‘राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व’ या विषयावर आपली मनोगते व्यक्त केली.यावेळी ‘मेरी मिट्टी मेरा देश’ या भारत सरकारच्या मोहिमेअंतर्गत अमृत कलश ठेवून मातीचे संकलन करण्यात आले.
या कार्यक्रमाप्रसंगी प्रमूख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले एन.सी.सी.विभागाचे कॅप्टन डॉ. बी. एम. सपकाळ यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय पातळीवर चालणारे विविध पथक व त्यांची माहिती दिली तसेच विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.ए.एल.चौधरी म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या जीवनातील राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व किती अनन्यसाधारण आहे त्यामुळे त्यात सहभागी होऊन जीवनमूल्य आत्मसात करावी. यावेळी त्यांनी भारत सरकारच्या विविध योजनांमध्ये स्वयंसेवकांनी सहभागी होण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेची स्वयंसेविका कीर्ती पाटील हिने केले तर आभार स्वयंसेविका ईशा पाटील हिने मानले.या कार्यक्रमाप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मोठया संख्येने उपस्थित होते.